हिंदु तरुणी घायाळ !
- हिंदूंनो, धर्मांधांकडून आपल्या लेकीबाळींना त्रास देण्याचे वाढते प्रकार पहाता त्यांना वेळीच धर्मशिक्षण देऊन धर्मनिष्ठ बनवा !
- तरुणींनो, वासनांध वृत्तीच्या धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
- स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
- अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! -संपादक
संभाजीनगर – ‘नीट’चा शिकवणीवर्ग संपल्यानंतर घरी जाण्यासाठी एक हिंदु तरुणी उस्मानपुरा येथून रिक्शात बसली. रिक्शाचालक धर्मांध सय्यद अकबर याने तिच्याशी अश्लील भाषेत बोलण्यास प्रारंभ केला. तेव्हा घाबरलेल्या हिंदु तरुणीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चालत्या रिक्शातून उडी मारली. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. शहरातील सिल्लेखाना चौक येथे १३ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ही घटना घडली. २८ ऑगस्ट २०२१ या दिवशी मोंढ्या नाक्यावर १७ वर्षीय मुलीसमवेत अशाच प्रकारची घटना घडली होती.
पोलिसांकडून धर्मांधाला अटक !
धर्मांध सय्यद तिच्याशी अश्लील भाषेत बोलू लागल्यावर ती प्रचंड घाबरली. रिक्शाचा वेगही वाढत होता. आपल्यासमवेत काहीतरी विपरीत घडणार असल्याचा अंदाज आल्याने तिने जिवाची पर्वा न करता धावत्या रिक्शातून उडी मारली. तिची प्रकृती ३० घंटे नाजूक होती. १५ नोव्हेंबर या दिवशी प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून आरोपी सय्यद अकबर याला अटक केली. पोलिसांनी सय्यद अकबर याला अटक केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले. या वेळी त्याची रिक्शाही जप्त करण्यात आली.
निर्लज्ज वृत्तीचा धर्मांध !
मूळ मालकाकडून तिसर्याने भाड्याने घेतलेली रिक्शा आरोपी सय्यद चालवत होता. तो मूळ मुंबई येथील असून त्याला ३ मुली आहेत. मोठी मुलगी १८ वर्षांची आहे. ‘तरुणीशी मी अश्लील बोललो’, असे त्याने निर्लज्जपणे पोलिसांना सांगितले.
(साभार : ओपी इंडिया हिंदी)
स्रोत: दैनिक सनातन प्रभात