Menu Close

शनिवारवाडा परिसरातील दर्गा काढा – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

शनिवारवाड्याच्या इतिहासात दर्ग्याचा उल्लेखच नाही !

शनिवारवाडा परिसरातील दर्गा आणि आनंद दवे(गोलातील छायाचित्र )

पुणे – शनिवारवाड्याच्या परिसरात ‘हजरत शाह ख्वाजा सैयद शाह पीर मुकबुल हुसेन’ हा दर्गा आहे. शनिवारवाड्याचा इतिहास कागदोपत्री उपलब्ध आहे; पण ‘असा कोणताही दर्गा त्या वेळी होता’, अशी इतिहासात नोंद नाही. वर्ष १२३३ मध्ये कुणी पीरबाबा पुण्यात आल्याचा कोणताही उल्लेख सापडत नाही. शनिवारवाड्याचे भूमीपूजन, ती वास्तू, तसेच येथील प्रत्येक घटनेचा इतिहास उपलब्ध आहे. यात कुठेही दर्ग्याचा उल्लेख आढळत नाही. हा दर्गा नंतर बांधण्यात आला आहे. त्यामुळे ‘शनिवारवाड्याच्या परिसरातील दर्गा हटवावा’, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली.

दवे पुढे म्हणाले की, अनेक वेळेला पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. (‘पुरातत्त्व विभागाने आतापर्यंतच्या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली’, असे म्हटल्यास चुकीचे काय ? – संपादक) राज्य सरकारलाही सर्व ठाऊक आहे. त्यामुळे आम्हाला याविषयी १५ दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास आम्ही न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहोत. (सरकार आणि पुरातत्व विभाग यांनी या दर्ग्याच्या प्रश्‍नाकडे तातडीने लक्ष द्यावे, ही जनतेची मागणी आहे ! – संपादक)

सौजन्य : TV9 Marathi

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *