Menu Close

मंगळुरू येथील बाँबस्फोटाचे प्रकरण : आरोपी शारिक होता इस्लामिक स्टेटच्या संपर्कात

अशा प्रकारच्या जिहादी कारवायांसाठी जिहादी मानसिकता निर्माण करणार्‍या सर्वप्रकारच्या गोष्टींवर आता बंदी घालणे आवश्यक झाले आहे. सरकारने आता अशी मानसिकता कोणत्या गोष्टींमुळे निर्माण होते, याचा शोध घेऊन ते जाहीर केले पाहिजे !

आरोपी शारिक

मंगळुरू (कर्नाटक) – येथे रिक्शामध्ये करण्यात आलेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शारिक यात स्वतःही ४५ टक्के भाजला आहे.  ‘पोलिसांच्या चौकशीतून शारिक इस्लामिक स्टेटच्या विदेशातील ‘हँडलर’च्या (आदेश देणार्‍याच्या) संपर्कात होता’, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) आलोक कुमार यांनी दिली.

१. आलोक कुमार यांनी सांगितले की, शारिक शिवमोग्गाच्या तीर्थहळ्ळी येथे रहाणारा आहे. त्याच्या मैसुरु येथील भाड्याच्या घरात बाँब बनवण्याचे साहित्य सापडले आहे. एका बनावट आधारकार्डच्या साहाय्याने येथे भाड्याचे घर घेऊन तो रहात होता. शारिक इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीने प्रभावित झाला होता. तो इस्लामिक स्टेटच्या संपर्कात होता. १९ सप्टेंबर या दिवशी शारिक याने त्याच्या २ साथीदारांसह तुंगभद्रा नदीच्या किनारी अससलेल्या एका जंगलात जाऊन बाँबस्फोटाची चाचणी केली होती. २० सप्टेंबरला पोलिसांनी त्याचे २ साथीदार माज मुनीर आणि सय्यद यासीन यांना अटक केली; मात्र शारिक पसार झाला होता. त्यानंतर तो मैसुरू येथे रहात होता. तेथेच त्याने बाँब बनवण्याचा सराव केला.

२. १९ नोव्हेंबरच्या सायंकाळी तो कुकरमध्ये बाँब ठेवून रिक्शाद्वारे पम्पवेल येथे जात होता; मात्र रिक्शा कनकनाडी भागातून जात असतांना कुकरमधील बाँबचा स्फोट होऊन रिक्शाला आग लागली. यात तो स्वतः आणि चालक पुरुषोत्तम घायाळ झाला.

३. शारिक याला वर्ष २०२२ मध्ये भिंतींवर देशविरोधी घोषणा लिहिल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती. काही दिवसांनंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *