Menu Close

पुणे येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने सी.पी.आर्.चे प्रशिक्षण पार पडले !

(‘सी.पी.आर्.’ – ‘कार्डिओ पल्मोनरी रेसुसीटेशन’ म्हणजेच हृदय आणि फुफ्फुस यांचे कार्य चालू करणे)

डमीवर प्रात्यक्षिक दाखवतांना डावीकडून डॉ. (सौ.) अश्विनी देशपांडे आणि डॉ. ज्योती काळे

पुणे – हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने येथे सी.पी.आर्.चे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. अचानक येणार्‍या हृदयविकाराच्या झटक्यावरील प्राथमिक उपचार देण्यासाठी, म्हणजेच ‘सी.पी.आर्.’  देण्यासाठी त्याचे महत्त्व, ते देण्याची अचूक पद्धत, यासाठी आवश्यक गुण याविषयी भूलतज्ञ डॉ. ज्योती काळे यांनी मार्गदर्शन केले. नवले रुग्णालयाच्या भूलतज्ञ विभागाच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना डॉ. कविता अदाते (उजवीकडे निळा गाऊन घालून उभ्या असलेल्या)

कोणतेही उपकरण आणि तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतांना भर रस्त्यात, घरी वा अन्य कुठेही आणि कधीही केवळ एक किंवा दोन व्यक्तींच्या साहाय्याने एखाद्याचे प्राण वाचवता येऊ शकतात. यासाठीच याला ‘जीवन संजीवनी’ असे नाव देण्यात आले आहे. अखिल भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या वतीने संपूर्ण भारतभरात असे उपक्रम राबवून सामान्य लोकांपर्यंत हे तंत्र पोचवण्याचे कार्य चालू आहे. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी यात पुढाकार घेतला, याविषयी भूलतज्ञ संघटनेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला.

उपस्थित प्रशिक्षणार्थी

या वेळी भूलतज्ञ संघटनेच्या डॉ. कविता अदाते आणि इतर सहकारी डॉक्टरांनी ‘डमी’वर (बाहुल्याच्या स्वरूपातील निर्जीव मनुष्यावर) प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थींनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वतः डमीवर याचा सराव केला. या वेळी लहान मूल आणि बालके यांनाही सी.पी. आर्. कसे देण्यात यावे, याचीही पद्धत शिकवण्यात आली. या कार्यक्रमाचा अनेकांनी लाभ घेतला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *