Menu Close

इराण : इस्लामविरोधी कृत्याबद्दल ८ जणांना अटक

“स्त्री मुक्तीवाले याबद्दल काही बोलतील का ? भारतीय स्त्रियांना अशाप्रकारे कोणतीच बंधने हिंदूंनी कधी घातली नाहीत, अटक तर दूरच !”

islam

तेहरान : ऑनलाईन मॉडेलिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आठ नागरिकांना इराणमध्ये अटक करण्यात आली असून या नागरिकांविरोधात इस्लामविरोधी कृत्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

इराणमध्ये सध्या महिलांकडून इन्स्टाग्राम वा अन्य सामाजिक संकेतस्थळांवर हिझाब न वापरता (मस्तक व केस आच्छादून न घेता) प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या छायाचित्रांविरोधात मोहिम सुरु करण्यात आली आहे. इराणमध्ये १९७९ मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर महिलांना केस झाकून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

अशा स्वरुपाच्या गैरइस्लामिक कृत्यांमध्ये सहभाग असलेल्या १७० जणांची यादी सुरक्षा दलाकडे तयार आहे. यामध्ये फॅशन क्षेत्रातील ५९ छायाचित्रकार व वेशभुषाकार, ५८ मॉडेल्स आणि ५१ व्यवस्थापक व तत्सम व्यावसायिकांचा समावेश आहे. “सोशल मिडीयाच्या माध्यमामधून कुटूंबव्यवस्थेच्या पायास आणि नैतिकतेस धक्का पोहोचविणाऱ्यांविरोधात‘ ही मोहिम सुरु करण्यात आली असल्याचे येथील सरकारी वकिल जवाद बबाई यांनी सांगितले.

इन्स्टाग्रामवर इराणमधून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये सुमारे २० % पोस्ट या मॉडेलिंग क्षेत्रामधील असून त्यामुळे “अनैतिक व इस्लामविरोधी संस्कृतीचा प्रसार‘ होत असल्याचा आरोप बबाई यांनी यावेळी केला. या १७० जणांपैकी २९ जणांना यासंदर्भातील इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतरही सुधारणा न झाल्याने यांमधील ८ जणांना अटक करण्यात आली. सायबरस्पेसची स्वच्छता करणे हा इराणच्या धोरणाचा भाग असल्याचे येथील सायबर गुन्हाविरोधी विभागाचे प्रवक्ते मोस्तफा अलिझादेह यांनी सांगितले.

संदर्भ : सकाळ 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *