Menu Close

शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव (कर्नाटक) येथे ४६ ठिकाणी स्मारकाची स्वच्छता आणि पूजनाचा कार्यक्रम !

हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा उपक्रम !

मुंबई – ‘शिवप्रतापदिन म्हणजे स्वराज्यावर आलेले अफझलखानरूपी मोठे संकट मोडून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याने केलेला पराक्रम !’ आज पुन्हा एकदा सर्व हिंदूंमध्ये शौर्याची जागृती व्हावी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे, यांसाठी शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते. महाराष्ट्र, गोवा राज्य, तसेच बेळगाव (कर्नाटक) अशा एकूण ४६ ठिकाणी स्मारकाची सामूहिक स्वच्छता आणि पूजन करण्यात आले. या उपक्रमात ८०० हून अधिक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.

महाराष्ट्रात रायगडमध्ये १, पुणे येथे २, सातारा येथे ३, सोलापुरात १, कोल्हापूर येथे ६, रत्नागिरी येथे ४, सिंधुदुर्गमध्ये ११, नाशिकमध्ये २, धुळे येथे ३, जळगावमध्ये ६, अमरावतीत २, गोवा राज्यात १ आणि बेळगाव (कर्नाटक) येथे ४ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची स्वच्छता, तसेच प्रतिमा पूजन करण्यात आले.

रत्नागिरी येथे शिवछत्रपतींच्या मूर्तीच्या पूजनानंतर जमलेले हिंदुत्वनिष्ठ
वेहेळे (चिपळूण, रत्नागिरी) येथे शिवप्रतापदिनाच्या पूजनाच्या वेळी जमलेले युवक-युवती
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचे धारकरी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी धुळे शहरात केलेले शिवछत्रपतींच्या स्मारकाचे पूजन
महादेव मंदिर, तवंदी निपाणी, कोल्हापूर येथे शिवछत्रपतींच्या मूर्तीपूजनाच्या वेळी जमलेल्या युवती
मळगाव, सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतांना महिला

क्षणचित्रे

१. रत्नागिरी येथे २ ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी करण्यात आली.

२. कोल्हापूर

अ. बेलेवाडी (गडहिंग्लज) – कार्यक्रम आवडला. पुढील वेळी आधी कळवल्यास मोठ्या प्रमाणात अशा कार्यक्रमाचे आयोजन करता येईल.
आ. पट्टणकुडी (निपाणी) – अल्प वेळेत हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी नियोजन केले.

३. धुळे

अ. स्मारक स्वच्छता आणि पूजन यांसाठी हिंदु जनजागृती समिती समवेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनीही सहभाग घेतला.

४. सिंधुदुर्ग

अ. हरकुळ खुर्द (मोहूळ) येथे कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या एका महिलेने व्याख्यानाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. त्या गावातील युवती आणि महिला यांना एकत्रित करणार आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *