खंडोबाची वाडी (जिल्हा पुणे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
पुणे – स्वातंत्र्योत्तर काळात अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. घटनेद्वारे अल्पसंख्यांकांना धर्मशिक्षणाची पूर्ण मुभा दिली गेली आणि त्यासाठी अनुदानही दिले गेले; परंतु त्याच वेळी बहुसंख्यांकांचा धर्मशिक्षणाचा अधिकार, तसेच अनुदानही नाकारण्यात आले. वक्फ बोर्डाला अधिकार देण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत वक्फ बोर्डाचा लँड जिहाद चालू आहे. विविध प्रकारच्या जिहादद्वारे इतर धर्मियांची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले. या सर्व गोष्टी पालटायच्या असतील, तर हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने खंडोबाची वाडी (ता. भोर, जिल्हा पुणे) येथे नुकतेच हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
शंखनादाने सभेला आरंभ झाला. प्रा. श्रीकांत बोराटे यांनी प्रस्तावना आणि सभेचे सूत्रसंचालन केले. शेवटी उपस्थित धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेतली.
क्षणचित्रे
१. सभेच्या एक घंटा आधी वीज गेल्याने सभा चालू करण्यास अडचण आली होती. तेव्हा भोरमधील धर्मप्रेमी योगेश कांबळे यांनी स्वतःच्या चारचाकीच्या प्रकाशात सभा चालू करण्याची सिद्धता दर्शवली.
२. खंडोबाची वाडी येथील धर्मप्रेमींनी सभेच्या मैदान स्वच्छतेची सेवा केली. वर्गात नियमित येणारा बालधर्मप्रेमी कु. यश प्रमोद सुर्वे (वय ८ वर्षे) याने समितीच्या कार्यकर्त्यांसोबत उत्साहाने भावपूर्ण सेवा केली.
३. धर्मप्रेमी रवींद्र गाडे सर हे सायंकाळी आळंदे गावात कार्यकर्त्यांसोबत प्रसारसेवेत सहभागी झाले होते, तसेच सभेच्या दोन दिवस आधीपासून सभेची सिद्धता, तसेच आयोजन यांमध्ये सहभागी झाले होते.
४. आळंदेवाडीतील धर्मप्रेमी श्री. आणि सौ. गव्हाणे हेही प्रसारसेवेत सहभागी झाले होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात