Menu Close

नगर येथील मिशनरी शाळेत शीख विद्यार्थ्यावर धर्मांतरासाठी दबाव

शाळेच्या उपमुख्याध्यापकांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नगर – तू नावासमोर ‘सिंह’ का लावतो ? पगडी का घालतो ? केस का राखतो ? हातात कडे का घालतो ? आमच्या शाळेत यायचे असेल, तर हे सगळे काढून टाक आणि इतर मुलांप्रमाणे रहा. यासाठी इतर धर्माचा स्वीकार कर किंवा ख्रिस्ती धर्मात ये, असे हरदिलसिंह सोदी या शीख विद्यार्थ्याला धमकावणार्‍या राहुरीतील ‘डी पॉल इंग्लीश मिडीयम स्कूल’चे उपमुख्याध्यापक पाद्री जेम्स याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शीख धर्मियांनी यासंबंधी संताप व्यक्त केला आहे.

‘या प्रकरणी कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेणार आहे’, असे सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांनी सांगितले. या प्रकरणी नववीत शिकणार्‍या हरदिलसिंह सोदी या विद्यार्थ्याने तक्रार दिली आहे. (देशातील ख्रिस्त्यांच्या शाळेत बहुतेक वेळा अशा प्रकारचा छळ केला जात असल्याच्या घटना समोर येऊनही दुर्दैवाने संबंधित राज्य सरकार याविषयी ठोस काही करतांना दिसत नाहीत. पालकांनो, इंग्रजी शाळांमध्येच असे प्रकार घडण्याचा घटना अधूनमधून उघडकीस येत असतात. अशा शाळांमधून मुलांवर काय संस्कार होत असतील ? अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही ते ठरवा ! – संपादक) हरदिलसिंह याने सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत मी धर्मांतर करण्यास ठाम नकार दिल्याने या गोष्टीचा राग येऊन पाद्री जेम्स मला मारण्यासाठी अंगावर धावून आले आणि विविध कारणे सांगून मला धर्मांतर करण्यासाठी बळजोरी करू लागले.

स्त्रोत :  दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *