समर्थकांच्या उद्रेकात ६ गाड्यांची हानी, ७ पोलीस घायाळ !
मुंबईत सहस्रावधी धर्मांधांकडून मार खाणारे पोलीस, निरपराध हिंदु भाविकांवर मात्र मर्दुमकी गाजवतात ! भाजप शासनाचे पोलीस काँग्रेस शासनाच्या काळाप्रमाणेच वागतात, असे कुणाला वाटल्यास त्यात नवल काय ?
नवी देहली : कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणी काही वर्षांपासून कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी त्यांचे भक्त आणि समर्थक गेल्या काही दिवसांपासून जंतरमंतर येथे बेमुदत सत्याग्रह करत आहेत.
१५ मेच्या रात्री संसद मार्गावरील पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करणार्या भक्तांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारानंतर भक्तांचा उद्रेक झाला. त्यांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली.
यात ६ गाड्यांची हानी झाली, तर ७ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी या प्रकरणी काही भक्त आणि समर्थक यांना कह्यात घेतले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात