हिंदूंनो, देशद्रोही याकूब मेनन आणि देशभक्त साध्वी यांची तुलना करून ओवैसी हे देशद्रोह्यांची बाजू घेतात, हे लक्षात घ्या !
हिंगोली : मुंबई बॉम्बस्फोटात मेमन कुटुंबियांतील महिलेच्या नावावर असलेल्या वाहनात स्फोटके, हत्यारे सापडल्याने याकूब मेमनला फासावर लटकवले; परंतु साध्वी प्रज्ञासिंहला मात्र याच प्रकारच्या वाहनाच्या परवान्याच्या सूत्रावरून मुक्त केले. ही प्रकरणे सारखीच असतांना प्रज्ञासिंह आणि मेमन कुटुंबाला वेगळा न्याय का, असा कांगावा ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलीमीनचे (एम्आयएमचे) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी १५ मे या दिवशी हिंगोलीतील जाहीर सभेत केला.
एम्आयएमचे आमदार वारीस पठाण यांनी विधानसभेत वन्दे मातरम् म्हणण्यास विरोध केल्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप, दोन्ही काँग्रेस, तसेच समाजवादी एक झाले. दलित आणि मुसलमान यांची केवळ मते लाटणारे हे पक्ष जर एक होत असतील, तर अन्यायग्रस्त असलेले मुसलमान आणि दलित एक का होऊ शकत नाहीत, असा प्रश्न त्यांनी या वेळी केला. (हिंदूंमध्ये फूट पाडणारे ओवैसी ! मुसलमान सोडून इतर सर्व काफिर आहेत, अशी वृत्ती असणारे कधीतरी दलितांना सोबत घेऊन कार्य करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात