अनुमती न मिळाल्यास २१ मेच्या रात्री ८ वाजता प्राणत्याग करणार !
- प्राणत्याग करून सरकार जागे होणार नाही. त्याऐवजी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. यासाठी हिंदूंनी संघटितपणे संत आणि साध्वी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे !
- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी संजय दत्त याला शिक्षा भोगतांना पत्नीच्या आजाराच्या कारणावरून जेथे महिनाभराची सुट्टी मिळते, तेथे आरोप सिद्ध न झालेल्या; परंतु अटकेत असलेल्या संतांना आणि धर्माभिमान्यांना सिंहस्थपर्वातील स्नानासाठी जामीन मिळायला हवा !
उज्जैन : येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात स्नान करण्याची मागणी करत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी १६ मेपासून रुग्णालयात उपोषणाला प्रारंभ केला. तसेच ही मागणी मान्य व्हावी यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांना पत्रही पाठवले आहे. अनुमती न मिळाल्यास २१ मेच्या रात्री ८ वाजता प्राणत्याग करणार, असे त्यांनी घोषित केले आहे.
१. साध्वी प्रज्ञासिंह येथील खुशीलाल आयुर्वेदीक रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. सिंहस्थ पर्वात स्नान करण्यास अनुमती मिळावी, यासाठी त्यांनी देवास न्यायालयातही अर्ज केला होता.
२. देवास न्यायालयाने २१ मे पूर्वी एक दिवसासाठी सशस्त्र पोलीस दलाबरोबर रुग्णवाहिकेतून प्रज्ञा सिंह यांना सिंहस्थात स्नान आणि महाकालेश्वर दर्शनासाठी एक दिवसाची विशेष अनुमती दिली होती; मात्र भोपाळ पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना स्नानास अनुमती नाकारली.
३. शोषित-वंचितांचे सरकार असल्याचे सांगणार्या मध्यप्रदेश सरकारने आपल्याला सर्वाधिक त्रास दिला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
४. जर मला काही झाले तर त्याला पोलीस अधिकारीच उत्तरदायी असतील, असे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे.
५. काही दिवसांपूर्वी सिंहस्थ पर्वातून हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य संघटनांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे अटकेत असलेल्या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यासारख्या संतांसहित साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासारख्या धर्माभिमान्यांना सिंहस्थ पर्वात स्नानासाठी जामिनावर सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
६. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष ठरवत त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात