सातारा – भारतभूमीला अनेक वीरांगना, पराक्रमी राजे, राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांचा वारसा आहे. आपल्या याच गौरवशाली परंपरेचा आदर्श ठेवून सर्वांनी हिंदु धर्माचे पालन केले पाहिजे. हिंदु महिलांवर होणारे अत्याचार, लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांसारख्या समस्या, तसेच गडावर होणारी अतिक्रमणे यांसारखे आघात रोखण्यासाठी भारत संवैधानिक स्तरावर हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होण्याची आवश्यकता आहे, यासाठी हिंदूंनी संघटित होऊन कृतीशील होण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी केले. खिंडवाडी येथील जिल्हा परिषद मैदानात झालेल्या ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयवार आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या.
या प्रसंगी खिंडवाडीच्या सरपंच सौ. पूजा बाबर, ग्रामपंचायत सदस्या सौ. कविता शेळके, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. जयवंत लोहार आदी मान्यवर उपस्थित होते. समितीच्या कु. रविना शेंडे यांनी सूत्रसंचालन केले, तसेच श्री. अनिकेत कदम यांनी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीचा परिचय सांगून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा सांगितली.