Menu Close

शाळांतून धर्मशिक्षण दिल्यास हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही – बापूसाहेब ढगे, माजी नगरसेवक

सोलापूर येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी रणरागिणी शाखेचे आंदोलन

सोलापूर – आफताबला फाशी होण्यासाठी सर्व स्तरांतून जनआक्रोशाची आवश्यकता आहे. सरकार दरबारात पाठपुरावा व्हायला हवा. हिंदूंनो वेळीच जागे होऊन शाळा, महाविद्यालये यांमध्ये धर्मशिक्षण देण्याचे, तसेच रामायण-महाभारत शिकवण्याची मागणी करा. हिंदु मुलांना शूर-वीर राष्ट्रपुरुषांचे शौर्य शिकवले जावे.  शाळांतून धर्मशिक्षण दिले गेल्यास हिंदु युवती धर्मांधांसमवेत पळून जाणार नाहीत, असे प्रतिपादन माजी नगरसेवक बापूसाहेब ढगे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी धर्मप्रेमी सुरज मदनावाले म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद’ आहे हे वर्ष २०१६ मध्ये न्यायालयानेही मान्य केले आहे. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र वेळीच ओळखून भारतातील प्रत्येक राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यात यावा.’’ ‘स्त्री शक्ती फाऊंडेशन’च्या अध्यक्षा कु. किरण माशाळकर म्हणाल्या की, आफताबला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. सरकारला हे शक्य नसल्यास त्याला जनतेच्या हवाली करा. जनता त्याला योग्य ती शिक्षा करेल. या वेळी रणरागिणी शाखेच्या जिल्हा संघटक श्रीमती अलका व्हनमारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. धनंजय बोकडे, धर्मप्रेमी श्री. देविदास सत्तारवाले, श्री. किशोर बिरबनवाले यांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनाला हिंदुत्वनिष्ठ श्री. रवि गोणे, आनंद मुसळे यांच्यासह मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला धर्मप्रेमी उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. आंदोलनाच्या वेळी रस्त्यावरून जाणारे अनेक लोक आंदोलनाचा विषय पाहून स्वत:हून स्वाक्षरी करण्यासाठी पुढे येत होते आणि आंदोलनाला पाठिंबा देत होते.

२. नरखेड (तालुका मोहोळ) येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीमती वैशाली बनसोडे यांनी रणरागिणी शाखेकडे पाठिंबा पत्र दिले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *