Menu Close

स‌ीरियातून अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांना अडवा, अन्यथा पुन्हा एकदा ९/११ सारखा हल्ला होऊ शकतो : डोनाल्ड ट्रम्प

syria_to_america

वॉशिंग्टन : स‌ीरियातून येणारे निर्वासित असेच अमेरिकेत श‌िरत राह‌िले, तर आपल्यावर पुन्हा एकदा ९/११ सारखा हल्ला होऊ शकतो, असे उद्गार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले रिपब्ल‌किन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले. हे निर्वासित अमेरिकेत येताना आयएसकडून मिळालेले मोबाइल घेऊन येत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. राष्ट्रीय बॉर्डर गस्त परिषद, पॉडकास्ट दरम्यान ते बोलत होते.

‘सर्व निर्वासितांकडे मोबाइल असतो. त्यांच्याकडे पैसे नसतात. अन्य आवश्यक गोष्टीही नसतात, पण मोबाइल सगळ्यांकडे असतात. त्याच्यासाठी पैसे कोण देते ? सर्व निर्वासितांकडे असलेल्या मोबाइलवर आयएसचा झेंडा असतो. अशा परिस्थ‌ितीत आपण त्यांना आपल्या देशात घेत आहोत, हे आश्चर्यकारक नाही का ? देशाबद्दल हृदयात आपुलकी नसलेले लोक आपले नेतृत्व करत आहेत. आता आपल्याला आपल्या सीमांच्या सुरक्षेबद्दल विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. खूप वाईट गोष्टी घडतील. हल्ले होतील. आज आपण ज्यांना देशात घेत आहोत तेच आपल्यावर हल्ले करतील,’ असा इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला.

ट्रम्प यांनी यावेळी हिलरी क्ल‌िंटन यांच्या इमिग्रेशन सुधारणांबाबतच्या प्रस्तावाबद्दल आण‌ि मेक्स‌िकाेलगतच्या दक्षिणेकडील सीमेवर भिंत उभी करण्याच्या स्वतःच्या प्रस्तावाबाबतही वक्तव्य केले. डिसेंबर महिन्यातही एका प्रचारसभेदरम्यान ट्रम्प यांनी देशात शिरणाऱ्या मुसलमानांवर पूर्ण बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला होता.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *