Menu Close

नागपूर येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात २१ डिसेंबरला भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्च्याचे आयोजन !

  • नागूपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्च्याची जोरदार सिद्धता चालू !

  • ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ विरोधी ‘सेल्फी पॉईंट’ला धर्मप्रेमींचा उस्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनसंघर्ष मोर्च्याच्या माहितीचे फलक रिक्शांवर लावून प्रसार करण्यात येत आहे.
‘सेल्फी पॉईंट’ येथे थांबून ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ विरोधी संतप्त भावना व्यक्त करतांना धर्मप्रेमी

नागपूर, १८ डिसेंबर (वार्ता.) – येथील धंतोलीमधील यशवंत स्टेडियम येथे २१ डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने भव्य ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याची जोरदार सिद्धता चालू असून या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर सिद्ध केलेल्या आकर्षक ‘सेल्फी पॉईट’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील शंकरनगर, दुर्गा चौक नगर आणि उद्याननगर येथे लावण्यात आलेल्या ‘सेल्फी पॉईंट’वर तरुणांसमवेत वयस्करही ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ यांच्या विरोधात स्वतःचे अभिप्राय आणि संतप्त भावना व्यक्त करत आहेत. ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’विरोधी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन या ‘सेल्फी पॉईंट’वरून केले जात आहे. हे ‘सेल्फी पॉईंट’ अनेक तरुण आणि नागरिक यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *