Menu Close

खराडी (पुणे) येथे ‘हलाल जिहाद’ या विषयावर आयोजित केलेल्या बैठकीला व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

व्यापार्‍यांना ‘हलाल जिहाद’विषयी मार्गदर्शन करतांना श्री. पराग गोखले

पुणे – भाजपची ‘पुणे शहर व्यापारी आघाडी’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हलाल जिहाद : आर्थिक षड्यंत्र’ या विषयावर येथील भाजपच्या शहर कार्यालयात ६ डिसेंबर या दिवशी एक विशेष व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी शहर आणि उपनगर येथील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित असलेले व्यापारी श्री. विजय नरेल्ला यांनी वरील विषय ऐकल्यावर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन खराडी येथील व्यापारीवर्गासाठी ‘हलाल जिहाद’ या विषयावर बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला विविध ठिकाणचे अनेक व्यापारी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी उपस्थितांना ‘हलाल जिहाद’ याविषयी माहिती सांगून ‘हिंदु संस्कृतीनुसार धर्माचरण केल्याने काय लाभ होतात ?’, याविषयीही अवगत केले. तसेच हडपसर येथे १ जानेवारी २०२३ या दिवशी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रणही दिले.

वैशिष्ट्यपूर्ण

१. श्री. विजय नरेल्ला यांनी ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात १० ठिकाणी बैठका घेण्याचे ध्येय घेतले आहे.

२. बैठकीला उपस्थित असणार्‍या व्यापार्‍यांनीही ‘त्यांच्या भागात ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात जागृती करण्यासाठी बैठका घेऊ’, असे सांगितले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *