बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांचे देशाची अपकीर्ती करणारे संतापजनक विधान !
- जर सिद्दीकी यांना खरेच असे वाटत असेल, तर त्यांनी स्वतःसह त्यांच्या सर्वच धर्मबांधवांना विदेशात जाण्यास सांगावे ! किती देश तुम्हाला रहाण्यासाठी शरण देतात, हेसुद्धा तुमच्या लक्षात येईल !
- रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारमधून हाकलून लावल्यानंतर बांगलादेशाव्यतिरिक्त (तेही नाईलाजाने) कोणत्याच इस्लामी देशाने त्यांना साहाय्य केले नाही, ही वस्तूस्थिती आहे, हे सिद्दीकी यांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे ! -संपादक
पाटलीपुत्र (बिहार) – भारत हा मुसलमानांसाठी रहाण्यासारखा देश राहिलेला नाही. त्यामुळे मी माझ्या परदेशात शिक्षण घेणार्या मुलांना तेथेच नोकरी करून तेथील नागरिकता घेण्यास सांगितले आहे, असे विधान सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
'भारत में मुस्लिम असुरक्षित हैं, बच्चों को वापस नहीं आने को बोल दिया है'… RJD नेता Abdul Bari Siddiqui के विवादित बोलhttps://t.co/kdcOueqQmC
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) December 23, 2022
१. अब्दुल बारी सिद्दीकी म्हणाले की, मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा सध्या अमेरिकेतील हॉवर्ड विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. मुलगी ‘लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स’मधून उत्तीर्ण झाली आहे. देशातील वातावरण पहाता मी माझ्या मुलांना सांगितले आहे की, तिकडेच नोकरी करा. तुम्हाला तेथील नागरिकत्व मिळाले, तर घेऊन टाका. भारताची सद्य:स्थिती पहाता तुम्हाला येथील परिस्थितीशी जुळवून घेता येणार नाही.
२. सिद्दीकी यांच्या या विधानावर बिहारमधील भाजपचे प्रवक्तेे निखिल आनंद यांनी टीका करतांना म्हटले की, सिद्दीकी यांच्यासारखी लोक स्वत:ला उदारमतवादी म्हणवतात; मात्र त्यांची विचारसरणी ही मदरशांमधील लोकांसारखी आहे. ते आपल्याच देशाच्या विरोधात गरळ ओकत आहेत.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात