६०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर), २५ डिसेंबर (वार्ता.) – येथे २१ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये ६०० हून अधिक उपस्थित धर्मप्रेमींनी धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील होण्याचा निर्धार केला. सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे आणि रणरागिणी शाखेच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित केले.
भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सभागृह आणि सभेसाठी लागणारे काही साहित्य उपलब्ध करून दिले, तसेच सर्वश्री राजेंद्र हुच्चे, तम्मा शेळके, यशवंत तात्या धोंडगे, मिलन कल्याणशेट्टी, धानय्या स्वामी आदी धर्मप्रेमींनी सहकार्य केले. विरक्त मठाचे मठाधिपती श्री.म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी यांनी केलेल्या आवाहनामुळे वीरशैव समाजातील लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यास साहाय्य झाले.
क्षणचित्रे
१. अनेक धर्माभिमानी सभास्थळी घोषणा देत येत होते.
२. सभा संपल्यानंतर अनेकांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली, तसेच ‘हिंदु राष्ट्र’, ‘लव्ह जिहाद’ यांविषयीचे ग्रंथ खरेदी केले.
३. सभा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी श्री. राजेंद्र हुचे यांनी ‘सभा निर्विघ्नपणे पार पडेपर्यंत चप्पल घालणार नाही’, असा संकल्प केला होता.
४. सभेनंतर १०० हून अधिक धर्मप्रेमी हे वक्त्यांशी चर्चा करण्यासाठी थांबले होते. त्यातील अनेकांनी धर्मकार्यात कृतीशील होण्याचा निर्धार केला.
५. पूर्वसिद्धतेसाठी आलेले ३ हिंदुत्वनिष्ठ म्हणाले, ‘‘अनेक वर्षांपासून आम्ही धर्मकार्य करत आहोत; मात्र ‘खरे कार्य आज करत आहोत’, असे वाटत आहे.’
स्रोत: दैनिक सनातन प्रभात