Menu Close

पाशवी वक्फ कायदा रहित करण्याची संघटित होऊन मागणी करा – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

परशुरामभूमी चिपळूणमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ संपन्न !

  • सभेला ५ सहस्र ५०० हिंदु धर्मप्रेमी उपस्थित

  • परशुरामभूमीतील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ‘वक्फ कायदा’ आणि ‘हलाल जिहाद’ यांविरोधात लढा देण्याचा हिंदूंचा निर्धार !

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु स्वाती खाडये, श्री. मनोज खाडये आणि श्री. नीलेश सांगोलकर

चिपळूण – आज भारतीय सैन्याकडे सर्वाधिक १८ लाख एकर, भारतीय रेल्वेकडे १२ लाख एकर, तर तिसर्‍या क्रमांकावर सर्वाधिक म्हणजे ८ लाख एकर भूमी वक्फ बोर्डाकडे आहे. रत्नागिरीतील, चिपळूणातील भूमीही वक्फ बोर्डाच्या कह्यात आहे. ती अद्याप आपल्याला ठाऊक नाही. काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड कायद्या’त केलेल्या सुधारणांमुळे हिंदू, ख्रिस्ती, शीख, बौद्ध आणि अन्य गैरमुसलमानांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचे अत्यंत भयानक अधिकार मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी तमिळनाडूतील तिरूचेथुरई हे गाव वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्यात आले. या गावातील श्री चंद्रशेखर स्वामींचे मंदिरही प्रत्यक्षात इस्लामही अस्तित्वात नव्हता, त्यापूर्वीचे म्हणजे २ सहस्र वर्षांपूर्वीच गावांत आहे.

कुडाळमधील एका तरुणाला काही दिवस काही मुसलमान डोंगराकडे जातांना दिसले. त्याने चौकशी केल्यावर त्या मुसलमानांनी ‘आम्हाला अल्लाने डोंगरात जाऊन धार्मिक विधी करायला हवेत, ते करायला जातो. तुम्ही आडवले, तर तुम्हाला पाप लागेल’, असे सांगितले. तिथे जाऊन तरुणाने पाहिले, तर तिथे दगड लावून हिरवी चादर घातलेली होती. हे ती भूमी वक्फ बोर्डाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे.

वक्फ कायद्याच्या नावाने भारतियांची संपत्ती हडप केली जात आहे. हा लँड जिहादच असून पंतप्रधानांनी हा पाशवी वक्फ कायदा वेळीच रहित करावा, अशी संघटितपणे जोरदार मागणी करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.

परशुरामभूमी चिपळूण येथे स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचे ध्येय हिंदु राष्ट्र स्थापनेचे आहे. याच राष्ट्र जागृतीच्या उद्देशाने समितीच्या वतीने २६ डिसेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा येथील श्री जुना कालभैरव मंदिराच्या शेजारील नवीन मैदानात पार पडली. या सभेतील विशाल जनसमुदायाला संबोधित करतांना श्री. मनोज खाडये बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर उपस्थित होते. या सभेला ५ सहस्र ५०० हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते.

श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले, ‘‘२०२५ मधील गुढीपाडवा हिंदु राष्ट्रातील गुढीपाडवा असणार आहे. ते आंदणात मिळणार नाही. युगांतरात संघर्ष होतो, हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष होणार आहे. हिंदु राष्ट्र पहाण्यासाठी मी काय करायचे हे समजून घेण्यासाठी आजची सभा आहे. हिंदु राष्ट्राचा पहिला झेंडा चिपळूण मध्ये रोवला जाईल. कोकणभूमी धर्मांतराचा अड्डा बनू पहात आहेत. एकही हिंदू धर्मांतरित होणार नाही, असे प्रयत्न करायला हवेत. लव्ह जिहादविरोधात केवळ मोर्चा काढून न थांबता देशात एकही श्रद्धा वालकर बनणार नाही अशी स्थिती निर्माण करायची आहे.’’ (श्रद्धा वालकर या हिंदु तरुणीची आफताब पुनावाला या मुसलमान युवकाने ३५ तुकडे करून हत्या केली आहे.)

आतंकवाद्यांना पोसणार्‍या हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करणार नाही, असा निश्‍चय करा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

श्री. मनोज खाडये

हिंदूंपुढील लव्ह जिहाद, लँड जिहादच्या संकटात आणखी एका म्हणजे हलाल जिहादची भर पडली आहे. हलाल ही संकल्पना केवळ मांसापुरती आणि इस्लाम धर्मियांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. हलाल प्रमाणपत्र मांसाहारी पदार्थांसह, अन्य अनेक खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, धान्य, शीतपेये, अगदी आयुर्वेदिक औषधांसाठीही लागू होत आहे. हलाल प्रमाणपत्र देणारी संस्था आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्यासाठी पैसा पुरवते. याचा अर्थ घरात १ हलाल उत्पादन येत असेल, तर घरात एक बाँब येत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘हलाल’ची अनिवार्यता केवळ मुसलमानांसाठी असतांना अशी उत्पादने सरसकट हिंदूंना विकली जात आहेत. १४ टक्के मुसलमानांच्या मागणीमुळे ८० टक्के हिंदु समाजाला सक्तीने हलाल उत्पादने विकली जात आहेत. हिंदूंना हलाल उत्पादने विकणे, हे हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्याच्या, तसेच ग्राहक अधिकारांच्या विरोधात आहे. ग्राहक म्हणून आतंकवादी पोसणार्‍या हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करणार नाही, असा निश्‍चय करा. भारतात निर्यात करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र दिले जाते, याविषयी केंद्रशासनाला पत्रासमवेत पुरावे पाठवले, तेव्हा सरकारने व्यापार मंत्रालयाच्या माध्यमातून हलाल प्रमाणपत्र रहित केले आहे. ही संघटनाची शक्ती आहे.

 हिंदु राष्ट्राच्या चळवळीसाठी भगवंताचे अधिष्ठान आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु स्वाती खाडये

विश्‍वातील कोणत्याही राष्ट्रांमध्ये बहुसंख्यांकांचा धर्म महत्त्वपूर्ण मानून त्यानुसार तेथील कायदे बनवले जातात. भारतात मात्र हिंदूबहुल असूनही हिंदु धर्माला कायद्याचा मूळ स्रोत म्हणून राजकीय संरक्षण दिलेले दिसत नाही. देशात अल्पसंख्यांकांना संरक्षण आणि बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष होत आहे. हिंदूंचे शिक्षण संस्थांना एक नियम आणि अल्पसंख्यांकांच्या शिक्षण संस्थांना वेगळा नियम आहे. शासकीय अनुदानातून मदरशांमधून इस्लामचे आणि कॉन्व्हेंट शाळांमधून बायबल शिकवले जाऊ शकते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांमधून हिंदु धर्म शिकवायचा असेल, तर तुम्हाला सरकारी अनुदान मिळू शकणार नाही. राज्यघटनेद्वारेच केल्या जाणार्‍या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करावा लागेल. अस्तित्वासाठी संघर्षच करावा लागेल. हिंदु राष्ट्राची चळवळ जर आपल्याला पुढे न्यायची असेल, तर त्यासाठी भगवंताचे अधिष्ठान आवश्यक आहे, अन्यथा हिंदु राष्ट्राचे कार्य मानसिक, बौद्धिक किंवा भावनिक पातळीलाच राहील.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना संघटित करून बलाढ्य शत्रूंना नमवले. हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शारीरिक स्तरावर सर्व आयुधांचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांच्या मुखात नेहमी ‘जगदंब जगदंब’ असा नामजप असे. त्यांना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांच्यासारखे श्रेष्ठ संत गुरु म्हणून लाभले. हिंदूंनो, हिंदु राष्ट्रासाठी संख्याबळ नाही, तर आध्यात्मिक शक्ती आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. वर्ष २०२५ च्या गुढीपाडव्याला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात येईल. त्यासाठी आपल्याला संघर्ष आणि हिंदूंचे संघटन करायला हवे.

आपल्यालाही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदू संघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदूसंघटन करतांना हिंदूंच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करण्याच्या जोडीला हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी साधना करून उपासनेची शक्ती वाढवणे आवश्यक आहे. काळमहिम्यानुसार कलियुगांतर्गत कलियुग समाप्त होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग आरंभ होणारच आहे; मात्र या आपत्काळाचा सामना करण्यासाठी, हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्याला वेग आणि बळ मिळण्यासाठी आपण प्रतिदिन साधना करण्याचा निश्‍चय करूया.

सरकारी कर्मचारी नव्हे, तर भक्तच मंदिरांची सेवा प्रामाणिकपणे करू शकतात ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

आपण स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष अनुभवले; पण देशाची खरी स्थिती काय आहे ? भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झालेली असतांना भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होणे अपेक्षित होते; पण देशावर धर्मनिरपेक्षता लादली गेली आणि परिणामी देशासमोर असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत, यामध्ये हिंदूंची मोठी हानी झाली आहे.

चर्चसाठी ‘डायोसेशन सोसायटी’ आहे, मशिदींसाठी स्वतंत्र ‘वक्फ बोर्ड’ आहे मग हिंदूंसाठी सरकार का ? धर्मनिरपेक्ष सरकारचे हिंदूंच्या मंदिरात काय काम ? सरकारीकरणामुळे मंदिर कारभारात भ्रष्टाचारच होतांना पहायला मिळत आहे. पंढरपूर येथील मंदिराची बाराशे एकर भूमी गायब झाली होती. सरकारकडे एक स्क्वेअर फुटाचीसुद्धा माहिती नव्हती. त्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून न्यायालयीन लढा मुंबई उच्च न्यायालयात चालू केला गेला. त्या माध्यमातून २०२२ पर्यंत मंदिराची ११०० एकर भूमी मंदिराला परत मिळवून देण्यात यश आले आहे. काशीविश्‍वेश्‍वर मंदिरा संदर्भातील लढाही चालू आहे; मात्र त्यासाठी समाजाची जागृती करणे आवश्यक आहे. हिंदूंची मंदिरे भक्तांच्या कह्यात असावीत, यासाठी समाजातून मागणी होणे आवश्यक आहे; कारण सरकारी कर्मचारी नव्हे, तर केवळ भक्तच मंदिरांची सेवा प्रामाणिकपणे करू शकतील. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये चिपळूणमधील देवस्थानांचाही समावेश आहे. शासनाच्या कह्यात असलेल्या मंदिरांमध्ये असे अपप्रकार घडत आहेत. हिंदु राष्ट्रात मंदिरे ही भक्तांच्या कह्यात असतील. त्यासाठी आपल्याला लढा देणे आवश्यक आहे.

अल्पसंख्यांकांकडून सांप्रदायिक दंगल केली, तरी अन्यायग्रस्त हिंदूंवरच कारवाई करून ‘धर्मनिरपेक्षता’ अबाधित ठेवली जाते. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय साध्य करता येण्यासाठी कायद्याची योग्य माहिती आणि वापर आवश्यक आहे. यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांची हानी करणार्‍या घटनांच्या संदर्भात विनामूल्य खटले लढवण्याची सिद्धता केली आहे.

असा झाला सभेचा प्रारंभ . . .

वेदमंत्रपठण करतांना ब्रह्मवृंद

सभेचा प्रारंभ सनातनचे साधक श्री. ज्ञानदेव पाटील यांनी केलेल्या शंखनादाने झाला. दीपप्रज्वलन सद्गुरु स्वाती खाडये, अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. मनोज खाडये यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. वेदमूर्ती श्री. ध्रुव भोळे, श्री. रूपेश हळबे, श्री. गणेशप्रसाद तांबे यांनी वेदमंत्रपठण केले. या ब्रह्मवृंदाचा सत्कार समितीचे श्री. संतोष घोरपडे यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख श्री. सुरेश शिंदे यांनी करून दिली. या सभेचे सूत्रसंचालन श्री. महेश लाड आणि डॉ.(सौ.) साधना जरळी यांनी केले.

व्यासपिठावरील सन्मान आणि सत्कार

सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान डॉ. (सौ.) शीतल माने यांनी केला.
समितीचे श्री. मनोज खाडये यांचा सत्कार विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. उदय चितळे यांनी केला.
हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांचा सत्कार जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. समीर शेट्ये यांनी केला.

स्वसंरक्षण प्रशिक्षण

श्री. प्रकाश कोंडसकर, कु. मृण्मयी कात्रे, श्री. महेश लाड आणि कु. श्रुति मांडवकर यांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके केली.

भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगतांना सनातनचे बालसाधक !

क्रांतीकारकांचा वेश परिधान करून बालसाधकांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व सांगून प्रबोधन केले.

सभेला उपस्थित मान्यवर

महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण प्रांतअध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, ह.भ.प. प्रकाश महाराज निवळकर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख श्री. सचिन कदम, शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. संजय रेडीज, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे श्री. दिलीप चव्हाण, श्री. निहार कोवळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्री. रामदास राणे, भाजपचे शहराध्यक्ष श्री. आशिष खातू, भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. वसंत ताम्हणकर, मनसेचे तालुकाध्यक्ष श्री. अभिनव भुरण, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. साईनाथ कपडेकर, राजे प्रतिष्ठान गोवळकोटचे अध्यक्ष श्री. विशाल राऊत, उद्योजक श्री. शैलेश टाकळे, गोरक्षक श्री. संदीपराव कदम, ह.भ.प. शांताराम नवेले, ह.भ.प. किरण घाग, लोटे येथील ह.भ.प. नारायण पवार, धामणंद येथील प्रमोद सकपाळ, वि.हिं.प.चे साईनाथ कापडेकर,पराग ओक, लोटिस्माचे श्री. प्रकाश देशपांडे, खेर्डीचे उपसरपंच विनोद भुरण, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष निखिल किल्लेकर,माजी नगरसेवक विजय चितळे, शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय रेडीज आणि सावर्डे येथील श्री संप्रदायाचे दिलीप मोहिरे

ह.भ.प. दत्ताराम मुंडेकर महाराजांची सभास्थळी दिंडीसह उपस्थिती
सभेला उपस्थित वंदनीय संत आणि जनसागर
विचारलेल्या प्रश्नावर धर्मप्रेमींनी हात उंचावून त्यांच्या भ्रमणभाषची विजेरी (टॉर्च) पेटवून प्रतिसाद देतांना

आभार

चितळे मंगल कार्यालयाचे श्री. मोहन चितळे, श्री. जयंत शेट्टी, श्री. प्रकाश तथा बापू काणे आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. प्रतापराव शिंदे यांनी सभा यशस्वी होण्यासाठी मोलाचे साहाय्य केले.

क्षणचित्रे

१. सावर्डे येथून ह.भ.प. दत्ताराम मुंडेकर महाराज सभास्थळी दिंडी घेऊन उपस्थित झाले. यांचे स्वागत समितीचे श्री. विकास निवळकर यांनी केले.
२. गोहत्या, हलाल प्रमाणपत्र, वक्फ कायदा यांच्या विरोधात चिपळूणमध्ये होणार्‍या आंदोलनांत आम्ही सहभागी होऊ असा निश्‍चय करणार ना ? असे विचारल्यावर असे विचारल्यावर उपस्थित धर्मप्रेमींनी हात उंचावून त्यांच्या भ्रमणभाषची विजेरी (टॉर्च) पेटवून प्रतिसाद दिला.
३. दिंडीमध्ये महिला वारकर्‍यांचा सहभाग लक्षवेधी ठरला !
४. वक्त्यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करणार्‍या घोषणांना धर्मप्रेमींकडून आवेशपूर्ण प्रतिसाद मिळत होता.
५. समाजात ठरलेल्या बैठका रहित करून अनेक जण हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी आले.
६. व्यापार्‍यांना आज सुट्टी असून अनेक जण बाहेरगावी पर्यटनासाठी जातात; मात्र तसे न जाता बरेच जण सभेसाठी आले.
७. गो सेवा संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु राष्ट्र सेनेचे रत्नागिरी येथील पदाधिकारी आणि सदस्य चिपळूण येथील सभेला आले.

सभेचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 
https://www.facebook.com/watch/live/?ref=watch_permalink&v=615293470356728

‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ⛳चिपळूण येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा⛳
? जात, पंथ, संप्रदाय सर्व विसरून एक #हिंदु म्हणून ही #हिंदुराष्ट्रजागृतीसभा पाहूया.
✊? ही सभा आपणही पाहूया आणि इतरांनाही पाठवूया !

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *