सांगली : मोहनदास गांधीजी यांनी देशासाठी फार काहीतरी केले म्हणून सांगण्यात येते. प्रत्यक्षात त्यांनी काय केले हे देशापासून लपवून ठेवण्यात आले. गांधीजींमुळेच आज फाळणी आणि असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांना राष्ट्रपिता म्हणावे असे कोणतेही कार्य गांधीजींनी केलेले नाही. याउलट छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणून प्रत्येक हिंदू आज ताठ मानेने जगू शकतो. देशाचे खरे राष्ट्रपिता हे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे देशातील नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र का नाही ? असा संतप्त प्रश्न आचार्य आर्य जितेंद्रजी महाराज यांनी उपस्थित केला. ते शिवतेज मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित गणपती पेठ येथील जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
या वेळी प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या हिंदु धर्मप्रसारक पू. साध्वी सरस्वती देवीजी, बह्मचारी अग्नीजी महाराज, डॉ. राजराजेश्वर महाराज यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मंडळाचे श्री. अंकुश जाधव यांनी केले. या वेळी आमदार श्री. सुधीर गाडगीळ, भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. हणमंतराव पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आचार्य आर्य जितेंद्रजी महाराज पुढे म्हणाले…
१. सांगली ही नथुराम गोडसे यांची भूमी आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. जो खरा देशभक्त आहे, अशा नथुरामांचे नाव आपण ७० वर्षे घेऊ शकत नाही हे किती दुर्दैव आहे.
२. हिंदूंनी काहीच कृती न केल्यास येणार्या १० वर्षांत ते अल्पसंख्य होतील, अशी स्थिती आहे.
३. मुस्लीम महिलांना बुरखा घालावा लागतो, तसेच मुस्लीम महिलांविषयी केल्या जाणार्या भेद-भावाविषयी तृप्ती देसाई का आंदोलन करत नाही ? केवळ हिंदु धर्माच्या विरोधातच आंदोलन करणार्या देसाई यांचा बेगडीपणाच दिसून येतो.
४. आज गोहत्येपासून गुन्हेगारीपर्यंत प्रत्येक अवैध कृतीत मुसलमान अग्रेसर आहेत.
५. मुस्लीम धर्मातील महिलांना सामान्य अधिकारही नाहीत, याउलट हिंदु धर्मात भारतीय स्त्रिला देवीचा दर्जा देण्यात येतो. यावरून हिंदु धर्म किती महान आहे, हे लक्षात येते.
या वेळी पू. साध्वी सरस्वती देवीजी म्हणाल्या..
१. आज देशात उघडपणे भारत तेरे तुकडे होंगे हजार, अशा घोषणा दिल्या जात आहेत. याला आपण त्याच भाषेत प्रत्त्युत्तर दिले पाहिजे.
२. अग्नीचा रंग हा भगवाच आहे. हा भगवा आपल्याला सतत प्रेरणा देतो. श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांपैकी कोणीतरी परदेशात झाले आहेत का ? यावरून भारताचे महत्त्व लक्षात येते. त्याचप्रमाणे संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांसारखे अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेले त्यावरून महाराष्ट्राचे असामान्यत्व लक्षात येते. त्यामुळेच अन्य कोणत्याही राज्याला महाराष्ट्र म्हणत नाहीत.
३. आज अमरनाथ यात्रेवर कर लावण्यात येतो, याउलट हजयात्रेला सवलत देण्यात येते, हिंदुबहुल देशातच हिंदूंवर अन्याय किती दिवस होत रहाणार ?
४. आज १४ प्रकारचे जिहाद अस्तित्वात आहेत. त्यांपैकी लव्ह जिहाद आणि लँड जिहाद सगळ्यात भयंकर आहेत. आज जवळपास प्रत्येक रेल्वे स्थानकावर मुसलमानांनी अवैधरित्या धार्मिक स्थळ उभारून कब्जा केला आहे.
५. रक्षाबंधनाला आज बहिणांना ओवाळणी म्हणून तलवार देण्याची आवश्यकता आहे. महिलांनीही त्यांना गार्गी, मैत्रेयी, झाशीची राणी व्हायचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.
६. परदेशातून आलेल्या राष्ट्रपतींना गंगा आरती करण्यासाठी घेऊन जाणारे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी एकमेव आहेत. श्री. मोदी देशाची संस्कृतीचा मान वाढवत आहेत.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमांच्या पूर्वी गोमातेचे पूजन करण्यात आले, तसेच व्यासपिठावरील शिवछत्रपतींच्या मूर्तीचे पूजनही करण्यात आले.
२. पू. साध्वी सरस्वती देवीजी आणि आचार्य आर्य जितेंद्रजी महाराज यांच्या ज्वलंत भाषणांमुळे आणि उपस्थितांकडून दोन्ही हात उंचावून देण्यात आलेल्या घोषणांमुळे अवघा परिसर दुमदुमून केला. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर खरोखरच ज्वलंत आणि प्रखर हिंदुत्वाचे विचार ऐकायला मिळाले, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. अनेकांनी आचार्य आर्य जितेंद्रजी महाराज म्हणजे हिंदुत्वाचा ज्वालामुखी हे एकच विशेषण पुरेसे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
३. कार्यक्रमासाठी गणपती पेठ परिसर तुडुंब भरून गेला होता. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
४. पू. साध्वी सरस्वती देवीजी यांनी उपस्थितांकडून देव, देश, धर्म यांच्या रक्षणासाठी कृती करण्याची प्रतिज्ञा करवून घेतली.
५. पू. साध्वी सरस्वती देवीजी आणि आचार्य आर्य जितेंद्रजी महाराज या दोघांनीही पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांचे कार्य आदर्श असल्याचे सांगत गुरुजी सांगत असलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणे आवश्यक आहे, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात