Menu Close

महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा तातडीने लागू करावा !

  • डहाणू येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी

  • आंदोलनात हिंदूंच्या समस्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी शेकडो हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर !

आंदोलनात उपस्थित धर्मप्रेमी

डहाणू – पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि हिंदूंचे धर्मांतर यांविषयीच्या वाढत्या घटना पहाता राज्यात तातडीने लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा, या मागण्यांसाठी डहाणू (प.) ययेथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. २६ डिसेंबर या दिवशी झालेल्या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह शेकडो धर्मप्रेमी हिंदू उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या धर्मप्रेमी हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. शासनाला देण्यात येणार्‍या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासीबहुल तालुक्यांत धर्मांतराचे प्रकार अनेक वर्षांपासून चालू आहेत. महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणीही आंदोलनात करण्यात आली.

मान्यवरांची मते !

१. हिंदु बांधवांचे धर्मपरिवर्तन करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास ते रोखण्यासाठी तात्काळ आम्हाला संपर्क करा. – ह.भ.प. सुभाष महाराज बन पाटील, वारकरी संप्रदाय

२. आपल्या मुलांना योग्य संस्कार होण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. आमच्या भगिनींचे तुकडे करणार्‍या नराधमांना कायमचा धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. – श्री. प्रवीण व्यास, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री, राष्ट्रीय हिंदु सेवा संघ

३. हिंदी चित्रपटसृष्टी लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असून याविरोधात कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे. – श्री. विजय राजपूत, डहाणू तालुका अध्यक्ष, राष्ट्रीय हिंदु सेवा संघ

४. भारतात आपल्या महिला आणि युवती यांचे धर्मांध अनेक तुकडे करत आहेत. याविरोधात कडक नियम केले जावेत, तरच अशा राक्षसांना कडक शिक्षा होईल. – श्री. अशोक राजपूत, गोरक्षा दल, डहाणू

५. राष्ट्रीय हिंदू सेवा संघाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष परेश भरवाड, पालघर जिल्हा महामंत्री कल्पना बारी, वनवासी कल्याण आश्रमाचे श्री. संतोष पिंगळे, समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. अर्चना अंधारे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *