हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे आंदोलन !
सोलापूर – श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, तसेच मंदिरात भ्रष्टाचार करणार्या दोषींवर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार गुन्हे नोंद करा, या मागणीसाठी जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार या ठिकाणी २८ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे, तसेच सर्वश्री अविनाश मदनावाले, सूरज मदनावाले, नरेश गणुरे, सुरज मदनावाले, देविदास सत्तारवाले, अभिषेक नागराळे, शिवाजी चिंता, शुभम रोहिटे, बसवराज पाटील, लिंगराज हुळ्ळे, लालकृष्ण दुंपेटी यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात