हल्ली कुणीही उठतो आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांवर टीका करतो. हे थांबवायचे असेल, तर कठोर प्रावधान असलेला ईशनिंदाविरोधी कायदा अस्तित्वात आणणे आवश्यक ! -संपादक
भाग्यनगर (तेलंगाणा) – भगवान अय्यप्पाविषयी अश्लाघ्य वक्तव्ये करणार्या ‘भारत नास्तिक संघा’चे अध्यक्ष बैरी नरेश यांच्यावर कडक कारवाईची मागणी करत अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी तेलंगाणा राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली. बैरी नरेश यांनी २ दिवसांपूर्वी कोडंगल येथे आयोजित केलेल्या एका सार्वजनिक मेळाव्यात भगवान अय्यप्पा स्वामींच्या विरोधात अश्लाघ्य आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी विधाने केली होती. त्यांनी नेमकी काय विधाने केली, ते समजू शकलेले नाही. भाग्यनगर येथे स्वामी अय्यप्पा भक्तांनी बैरी नरेश यांना चोपले. त्या वेळी पोलिसांनी त्यांची सुटका केली. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
भगवान अयप्पा स्वामी पर ‘नास्तिक’ नरेश ने की अपमानजनक टिप्पणी, 3 थानों में केस दर्ज: भीड़ ने पीटा, Video#Telanganahttps://t.co/ooPlqrzzzd
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 30, 2022
१. बैरी नरेश यांनी केलेल्या अवमानास्पद विधानाविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आणि भगवान अय्यप्पा स्वामी भक्तांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली. ‘फुकटच्या प्रसिद्धी मिळण्यासाठी हिंदूंच्या देवतांची विटंबना करणे हल्ली प्रचलित झाले आहे. भगवान अय्यप्पा स्वामींच्या विरोधात अवमानकारक विधाने करून करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी बैरी नरेश यांना कठोर शिक्षा करावी’, अशी मागणी तक्रारदारांपैकी एक असलेल्या कराटे कल्याणी नावाच्या महिलेने केली आहे.
२. बैरी नरेश दलित नेते आहेत. त्यांनी याआधीही हिंदूंच्या देवता आणि प्रथा-परंपरा यांच्याविषयी टीका केली आहे.
३. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय यांनी या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी ‘भारतीय राष्ट्र समिती’च्या सरकारकडे केली आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात