Menu Close

नंदुरबार येथे लव्ह जिहाद आणि महिला सुरक्षा जनजागृतीपर व्याख्यान पार पडले !

  • प्रथम हिंदु राष्ट्र संस्थापक वीर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी यांच्या ८८२ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

  • रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी केले मार्गदर्शन

कार्यक्रमात बोलतांना कु. रागेश्री देशपांडे

नंदुरबार – प्रथम हिंदु राष्ट्र संस्थापक झुजौतिखंड (बुंदेलखंड) भूतकालीन शासक वीर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी यांच्या ८८२ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार खंगार समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यानिमित्त बाहेरपुरा हाट दरवाजा परिसर येथे आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. वीर योद्धा खेतसिंह यांचे जीवनवर्णन आणि शौर्यगाथेची अमूल्य माहिती खंगार समाज प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुमित परदेशी यांनी दिली, तर ‘लव्ह जिहाद : महिला सुरक्षा आणि राष्ट्र-धर्मजागृती’ यांवर हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. ‘चित्रपटातून होणारे ‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण रोखायला हवे. हे जिहादी संकट रोखण्यासाठी हिंदु मुलींनी धर्माचरण करणे का आवश्यक आहे ?’, याविषयी कु. रागेश्री देशपांडे यांनी सांगितले.

माजी सैनिक श्री. अरविंद निकम म्हणाले, ‘‘आपण आपला शौर्यशाली इतिहास अभ्यासला पाहिजे. आपण देशाचे देणे लागतो. ज्याप्रमाणे खंगधारी समाजाने भूतकाळात देश आणि धर्म यांचे रक्षण केले, त्याप्रमाणे प्रत्येकाने समाजात वावरतांना देशाप्रती नेहमी सैन्यासारखे कर्तव्यदक्ष राहिले पाहिजे.’’

मान्यवर आणि खंगार समाज यांच्या वतीने राष्ट्रपुरुष महाराजा खेतसिंह यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. तद्नंतर आयुष्यभर देशासाठी सेवा दिलेल्या माजी सैनिकांचा सन्मान हिंदु अधिपती महाराजा खेतसिंह यांची प्रतिमा भेट देऊन करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख मान्यवर, माजी सैनिक, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते, तसेच राजकीय पक्षातील मान्यवर अन् अन्य सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व हिंदुप्रेमींनी परिश्रम घेतले.

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *