Menu Close

‘लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतरबंदी यांसाठी कठोर कायदा करण्यासाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने धाराशिव अन् शाहूवाडी (कोल्हापूर) येथे मोर्चा

  • धाराशिव येथील समस्त हिंदूंच्या ‘जनआक्रोश मोर्चा’त ५ सहस्र हिंदूंचा सहभाग !

  • ‘लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतरबंदी यांसाठी कठोर कायदा करण्याची मागणी

मोच्र्यामध्ये सहभागी झालेल्या हिंदूंना संबोधित करतांना कु. वर्षा जेवळे

धाराशिव – लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे करावेत या प्रमुख मागणीसाठी ३ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोच्र्यामध्ये महिला, शालेय विद्यार्थिनी यांसह ५ सहस्र हिंदू सहभागी झाले होते.

राष्ट्रमाता जिजाऊ चौकातून निघालेल्या मोच्र्याचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ करण्यात आला. या वेळी ‘धर्मांतर’ आणि ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदे व्हावे या मागणीचे निवेदन महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना दिले.

लव्ह जिहाद करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – कु. वर्षा जेवळे, सनातन संस्था

कु. वर्षा जेवळे

श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर किती हिंदू युवतींचे बळी गेल्यानंतर प्रशासन ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करणार ? लव्ह जिहाद करणार्‍यांना फाशी द्या. तरच अशा प्रकरणांवर नियंत्रण येईल. ९ राज्यांत हा कायदा लागू आहे, तर महाराष्ट्रातही हा कायदा लागू करण्यात यावा. हिंदु संस्कृती आणि स्वभाषा यांचा अभिमान नसल्यामुळे हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. त्यामुळे हिंदूंनी पुढील पिढीला हिंदु संस्कृतीचे महत्त्व शिकवावे.

‘जनआक्रोश मोर्चा’त महिला, शालेय विद्यार्थिनी यांसह ५ सहस्र हिंदूंचा सहभाग

शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे ४ सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग !

मोच्र्याच्या प्रारंभी ध्वजपूजनाच्या वेळी प्रार्थना करतांना हिंदू

शाहूवाडी (जिल्हा कोल्हापूर) – ‘लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतरबंदी यांसाठी कठोर कायदा करण्यासाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने ३ जानेवारीला तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोच्र्यासाठी भाजप, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, व्यापारी असोसिएशन, सनातन संस्था, तसेच शाहूवाडी तालुक्यातील विविध गावांतील हिंदू असे ४ सहस्रांहून अधिक हिंदु सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर आणि तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

मलकापूर येथील नरहर मंदिरापासून मोच्र्याला प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेश विभूते यांनी केले. भगवे झेंडे, भगव्या टोप्या, तसेच महिलांनीही भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. यामुळे शाहूवाडी-मलकापूर भगवेमय झाले होते. जागृती करणारे विविध फलक हिंदूंनी हातात घेतले होते. मोर्चा झाल्यावर निवासी नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *