Menu Close

बंगालमध्‍ये हिंदु पत्नीची हत्‍या करून तिचे २ तुकडे करणार्‍या महंमद अन्‍सारूल याला अटक

‘मुसलमानाशी विवाह करणे; म्‍हणजे मरण पत्‍करण्‍यासारखे आहे’, हे हिंदु युवती जाणतील का ? -संपादक

सिलीगुडी (बंगाल) – येथील रहिवासी असणारा महंमद अन्‍सारूल याने पत्नी रेणुका खातून हिची हत्‍या करून तिच्‍या शरिराचे २ तुकडे केले. नंतर त्‍याने ते तुकडे महानंदा नदीच्‍या कालव्‍यात फेकले. अन्‍सारूल याला पोलिसांनी अटक केली आहे.

१. रेणुका बेपत्ता असल्‍याची तक्रार १० दिवसांपूर्वी पोलीस ठाण्‍यामध्‍ये प्रविष्‍ट करण्‍यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करतांना पोलिसांनी अन्‍सारूल याला कह्यात घेतले. चौकशी केल्‍यावर त्‍याने गुन्‍ह्याची स्‍वीकृती दिली.

२. रेणुका ही ब्‍युटी पार्लरमध्‍ये काम करत होती. ती सातत्‍याने भ्रमणभाषवर बोलत असे. त्‍यामुळे अन्‍सारूल याला तिच्‍या चारित्र्यावर संशय घेऊ लागला.

३. अन्‍सारूल याने रेणुका हिला बाहेर फिरायला घेऊन जाण्‍याच्‍या बहाण्‍याने घरापासून १० किलोमीटर दूर नेले. तेथे तिची हत्‍या करून तिच्‍या शरिराचे २ तुकडे केले.

४. रेणुका हिच्‍या कुटुंबियांनी ‘रेणुका आणि अन्‍सारूल यांचा ४ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्‍यांच्‍यात वारंवार खटके उडत असत. आमची मुलगी बेपत्ता झाल्‍यावर अन्‍सारूल याने तिची हत्‍या केल्‍याचा आम्‍हाला संशय आला’, असे सांगितले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *