Menu Close

‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे हिंदूंंची वंशवृद्धी रोखण्‍याचे षड्‌यंत्र – सौ. भक्‍ती डाफळे, रणरागिणी शाखा

हडपसर (पुणे) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत उमटला १० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींचा हुंकार !

सभेला उपस्थित धर्मप्रेमी
सभेला उपस्थित धर्मप्रेमी
सौ. भक्‍ती डाफळे

हडपसर (पुणे) – जिहाद्यांना संपूर्ण जगावर इस्‍लामचे राज्‍य स्‍थापन करायचे आहे. यासाठी जोपर्यंत जगातील अंतिम व्‍यक्‍ती इस्‍लाम स्‍वीकारत नाही, तोपर्यंत त्‍यांचा संघर्ष म्‍हणजे ‘जिहाद’ चालूच राहील. युवावस्‍थेतील प्रेमाच्‍या भावनांचा तथा शारीरिक आकर्षणाचा उपयोग करून हिंदु युवतींना गळाला लावले जाते. लग्‍नानंतर मुलीवर धर्म पालटण्‍याची बळजोरी का ? दोघेही आपापल्‍या धर्माचे पालन एकाच वेळी का करू शकत नाहीत ?  प्रत्‍येक गोष्‍टीत इस्‍लामप्रमाणे करण्‍याची बळजोरी आणि त्‍यासाठी अत्‍याचार करणे हे प्रेम नसून जिहाद आहे. युवतींनो, आता मुक्‍तपणे जगत असतांना पुढील आयुष्‍य बुरख्‍यात घालवण्‍याची तुम्‍ही सिद्धता आहे का? लग्‍नानंतर आपल्‍याच नवर्‍याच्‍या इतर ३ बायकांसमवेत संसार करण्‍याची तुमची सिद्धता आहे का ? धर्माचरण करून राजमाता जिजाऊ आणि पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर यांचा आदर्श घ्‍या. ‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे प्रेम नव्‍हे, तर हिंदूंंची वंशवृद्धी रोखण्‍याचे षड्‌यंत्र आहे, हे जाणा. त्‍यामुळे जागृत व्‍हा, संघटित व्‍हा आणि धर्मरक्षणाची धुरा हाती घ्‍या, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्‍या रणरागिणी शाखेच्‍या सौ. भक्‍ती डाफळे यांनी केले.

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी साधना करून उपासनेची शक्‍ती वाढवा ! – सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्‍था

सद्गुरु नंदकुमार जाधव

एकेकाळी जगभरातील विद्यार्थी भारतात तक्षशिला, नालंदा यासारख्‍या विश्‍वविद्यालयात ज्ञानमोती वेचण्‍यासाठी येत होते. आज मात्र भारतात निधर्मीपणाचा गवगवा होत आहे. खरेतर भारतीय घटनेनुसार सर्व धर्मियांना समान वागणूक मिळाली पाहिजे; परंतु प्रत्‍यक्षात अल्‍पसंख्‍यांकांच्‍या धर्माधारित शिक्षण संस्‍थांना शासकीय अनुदान मिळते. त्‍यामुळे मदरसे आणि कॉन्‍व्‍हेंट शाळा येथे त्‍यांच्‍या धर्माचे शिक्षण दिले जाते; परंतु वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांमधून हिंदु धर्माची शिकवण द्यायची असेल, तर त्‍याला सरकारी अनुदान मिळू शकत नाही. हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी साधना करून उपासनेची शक्‍ती वाढवा.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथे मारुतराव काळे प्राथमिक शाळेच्‍या मैदानावर हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यात त्‍या बोलत होत्‍या. या वेळी व्‍यासपिठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मूर्तीला पुष्‍पहार अर्पण करण्‍यात आला. या सभेला ८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींचा उत्‍स्‍फूर्त सहभाग लाभला.

हिंदूंनो, ‘हिंदु राष्‍ट्र’ कि ‘इस्‍लामिक राष्‍ट्र’ हवे, हे ठरवण्‍याची ही निर्णायक वेळ ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

सध्‍या हिंदुविरोधी षड्‌यंत्रे चालू आहेत. वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्‍लामी देश करण्‍याचे जिहाद्यांचे षड्‌यंत्र असल्‍याचे उघड झाले आहे. आता ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’ कि ‘हिंदु राष्‍ट्र’ असा प्रश्‍न नसून ‘इस्‍लामी राष्‍ट्र’ कि ‘हिंदु राष्‍ट्र’ हा प्रश्‍न आहे. हीच ती निर्णायक वेळ आहे; म्‍हणूनच हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्यात तन, मन, धन आणि कौशल्‍य पणाला लावून सहभागी व्‍हा !

क्षणचित्रे

  • ‘राम कृष्‍ण हरि’ नामाचा गजर करत सभास्‍थळी आलेल्‍या बाल वारकर्‍यांची दिंडी सर्वांचे आकर्षण ठरली.
  • विविध राष्‍ट्रपुरुषांच्‍या वेशभूषेतील बालकक्ष सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
  • आजूबाजूच्‍या विविध गावांतून गटागटाने धर्मप्रेमी घोषणा देत आणि भगवे झेंडे घेऊन सभास्‍थळी येत होते.
  • सभास्‍थळी उपस्‍थिती वाढल्‍याने प्रदर्शन कक्षाच्‍या जागेत पालट करावे लागले.
  • धर्मप्रेमी उत्‍स्‍फूर्तपणे वक्‍त्‍यांना प्रतिसाद देत घोषणा देत होते.

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *