पलूस (जिल्हा सांगली) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन
पलूस (जिल्हा सांगली – ‘लव्ह जिहाद’ हा देशासमोरील मोठा धोका आहे. त्यासाठी पाल्यांनी त्यांच्या मुलीला संस्कार देऊन त्यांचे या जाळ्यापासून रक्षण करावे, तसेच प्रत्येकाने धर्मशिक्षणही घेणे आवश्यक आहे. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जोपासली पाहिजे, असे आवाहन ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे धारकरी श्री. रोहित पाटील यांनी केले. ते १४ जानेवारीला शिवतीर्थ येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. विद्या सादुल यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. पवन देसाई आणि इतर धारकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणदी येथील श्री. राहुल इंगळे, ‘श्री संप्रदाया’चे श्री. आकाराम शिसाळ, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या संदर्भात ज्या विषयाच्या संदर्भात आंदोलन करण्यात आले, त्याच्याशी संबंधित निवेदने १६ जानेवारी या दिवशी पलूस येथे तहसीलदार निवास ढाणे यांना देण्यात आली. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. पवन देसाई, डॉ. विशाल पाटील, धर्मप्रेमी शरद पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. भीमराव खोत उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. आंदोलनासाठी मिरजेतून धर्मप्रेमी श्री. ऋषिकेश राजेंद्र जाधव आले होते.
२. पलूस येथील रिक्शाचालक श्री. विकास विलास लाड यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली.
३. ‘एस्.बी.एन्’ या वृत्तवाहिनीचे श्री. संदीप नाझरे यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले.
४. या आंदोलनात अनेक हिंदु युवक आणि युवती स्वत:हून सहभागी झाले.