Menu Close

मंगरूळपीर (वाशिम) येथे उरूसामध्ये धर्मांधांनी मिरवले क्रूरकर्म्या औरंगजेबाचे चित्र !

  • पाकिस्तानचे झेंडेही फडकावले !

  • हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर पोलिसांकडून गुन्हा नोंद

(उरूस म्हणजे मुसलमानाच्य पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित उत्सव)

  • क्रूरकर्म्या औरंगजेबाचे चित्र हातात घेऊन मिरवायला आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवायला हा पाक आहे का ? हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍या धर्मांधांना तात्काळ शिक्षा होणे आवश्यक !
  • हिंदुत्वनिष्ठ आक्रमक झाल्यावर गुन्हा नोंदवणारे धर्मांधप्रेमी पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? -संपादक 
फलकावर असणारे औरंगजेबाचे चित्र

वाशीम – जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील एका दर्ग्यातील उरूसामध्ये १४ जानेवारी या दिवशी औरंगजेबाचे चित्र लावण्यात आले होते. या उरूसासाठी २ डिजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) वाजवण्याची अनुमती पोलिसांनी दिली होती; मात्र २१ डिजे वाजवण्यात आले. (अनुमती न घेता इतक्या मोठ्या प्रमाणात डिजे वाजवले जात असतांना पोलीस काय करत होते ? हिंदूंनी असे केले असते, तर पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यक्रम बंद पाडला असता; मात्र पोलिसांकडून अल्पसंख्यांकांना अशा सवलती दिल्या जातात, हे लक्षात घ्या ! – संपादक) या वेळी पाकिस्तानचे झेंडेही फडकावण्यात आले, असे वृत्त एका वृत्तसंकेतस्थळाने प्रसारित केले आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी १५ जानेवारी या दिवशी क्रूरकर्मा औरंगजेबाचा पुतळा जाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. (हिंदुत्वनिष्ठांच्या निषेधानंतर गुन्हा नोंद करणारे पोलीस हिंदूंच्या संकटकाळी रक्षणासाठी येतील का ? – संपादक)

सौजन्य एबीपी माझा 

औरंग्याचे उदात्तीकरण करणार्‍यांवर कठोर कारवाईसाठी शासनाने अध्यादेश काढा ! – हिंदु जनजागृती समिती

मंगरूळपीर, वाशिम येथे बाबा हयात कलंदर दर्ग्यातील उरूसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पाकिस्तानी झेंडे आणि क्रूरकर्मा औरंगजेबाचे चित्र असलेले फलक हातात घेऊन नाचवण्यात आले. या घटनेचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. काही धर्मांध जाणीवपूर्वक क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करून राज्यातील शांतता भंग करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू पहात आहेत. अशांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करता यावी, यासाठी शासनाने अध्यादेश पारित करावा, तसेच पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याच्या प्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

समितीच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत…

१. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली असली, तरी अशा प्रकारे औरंगजेबाचे उदात्तीकरण तथा पाकिस्तानचा झेंडा फडकावण्यामागे काही षड्यंत्र आहे का, याचीही शासनाने सखोल चौकशी करावी.

२. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन, तसेच मंदिरे फोडली, हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करून जनतेवर अत्याचार केले, छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, अशा हिंदुद्वेष्ट्या औरंगजेबाचे उदात्तीकरण हा महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. काही वर्षांपूर्वी अफझजखान वधाचे चित्र लावण्याने धार्मिक भावना दुखावल्या जातात, म्हणून त्या चित्रावर प्रतिबंध आणणारा आदेश तत्कालीन गृहमंत्र्यांनी काढला होता. तशाच प्रकारे औरंगजेबाचे उदात्तीकरण रोखण्यासाठी शासनाने कठोर असा शासन आदेश तात्काळ काढावा, अशी आमची मागणी आहे.

३. बाबा हयात कलंदर दर्ग्याच्या उरूसामध्ये हा आक्षेपार्ह प्रकार घडल्यानंतर तेथील मुल्ला-मौलवी वा दर्गा ट्रस्ट यांनी पुढे येऊन अशा घटनांचा निषेध व्यक्त केलेला नाही. त्यामुळे त्यांचा या प्रकाराला पाठिंबा होता का ? हे शोध घेऊन दर्ग्याच्या ट्रस्टवर, तसेच संबंधित मुल्ला-मौलवींवरही कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

४. ‘मिरवणुकीसाठी पैसा कुणी पुरवला ?’, ‘या दर्ग्याला कोणाकडून निधीपुरवठा होतो ?’ आणि ‘तेथे आणखीन काही आक्षेपार्ह प्रकार होतात का ?’, याचीही सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

५ . या घटनेचा निषेध करणार्‍या काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांवरच पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याचे समजले आहे. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, तसेच यातून राष्ट्रप्रेमींचे खच्चीकरण करणार्‍या पोलिसांवरही कारवाई केली पाहिजे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *