१४ जणांविरोधात गुन्हा नोंद !
- हिंदूबहुल भारतात धर्मांतराला विरोध करूनही खुलेपणाने धर्मांतर केले जाणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
- हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक ! -संपादक
आळंदी (जिल्हा पुणे) – येथील मरकळ गावात काही जण लोकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोकांच्या घरासमोर जाऊन ‘तुम्ही बायबल वाचता का ? चर्चमध्ये या, आम्ही तुमच्या व्यवसायाला आर्थिक साहाय्य करू’, असे आमीष दाखवत आहेत. या प्रकरणी १४ जणांवर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद झाला. यात ३ महिला आरोपी आणि एक अल्पवयीन मुलगी यांचा समावेश आहे. प्रसाद साळुंखे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. काही दिवसांपूर्वीच आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न झाल्याने धर्मांतरबंदी कायद्यासाठी १५ जानेवारीला विराट जनमोर्चा काढण्यात आला. दुसर्याच दिवशी धर्मांतराची घटना समोर आली. साळुंखे म्हणाले, ‘‘या लोकांनी कुटुंबांचा पुष्कळ छळ केला. प्रदीप वाघमारे आणि प्रशांत वाघमारे हे लोकांना पैशांचे आमीष दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास सांगत होते. आमच्या घरातील देवतांचे चित्र बघून त्यांना शिव्या दिल्या. ‘जो स्वतः भीक मागतो, तो तुमचा देव तुम्हाला काय वाचवणार ?’, असे म्हणून त्यांनी हिंदु देवतांना भिकारी संबोधले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात