Menu Close

‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे संस्‍थापक श्री श्री भगवान यांच्‍या ८२ व्‍या जन्‍मोत्‍सवामध्‍ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री श्री भगवान यांचे कार्य

‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे संस्‍थापक श्री श्री भगवानजी

श्री श्री भगवान यांनी १९ नोव्‍हेंबर १९८९ या दिवशी ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’ची स्‍थापना केली. या माध्‍यमातून श्री श्री भगवान गेल्‍या ३३ वर्षांपासून मानवामध्‍ये सत्‍याची ज्‍योत तेवण्‍याचा प्रयत्न करत आहेत. या संस्‍थेचे मुख्‍य कार्यालय गौहत्तीमध्‍ये (आसाम) असून भारताच्‍या विविध राज्‍यांमध्‍ये यांच्‍या अनेक शाखा आहेत. याखेरीज नेदरलँडमध्‍ये मोठे कार्य आहे, तसेच स्‍पेन, इंग्‍लंड, अमेरिका, कॅनडा, क्रोएशिया, इंडोनेशिया आदी देशांमध्‍ये कार्य आहे.


श्री श्री भगवान यांचा ८२वा जन्‍मोत्‍सव

कोलकाता (बंगाल) – ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे संस्‍थापक श्री श्री भगवानजी यांचा ८२ वा जन्‍मोत्‍सव ‘व्‍यापी सायन्‍स सिटी मेन ऑडिटोरियम’मध्‍ये साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमामध्‍ये हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे, समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्‍य समन्‍वयक श्री. शंभू गवारे यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्‍ये प्रतिष्‍ठित वक्‍ते, संन्‍यासी, संन्‍यासिनी, साध्‍वी आदींची वंदनीय उपस्‍थिती होती. या कार्यक्रमात श्री श्री भगवान यांच्‍या जीवनावर लिखित पुस्‍तकाच्‍या तृतीय खंडाचे लोकार्पण झाले. हे पुस्‍तक त्‍यांचे संन्‍यासी शिष्‍य स्‍वामी प्रज्ञानानंदजी यांनी लिहिले आहे. या कार्यक्रमाच्‍या शेवटी श्री श्री भगवान यांच्‍या जीवनावर आधारित एका ‘स्‍लाईड शो’ दाखवण्‍यात आला.

क्षणचित्रे

१. श्री श्री भगवानजी यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शुभेच्‍छा पत्र पाठवून कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

२. या कार्यक्रमात श्री. रमेश शिंदे आणि अन्‍य मान्‍यवर यांच्‍या हस्‍ते ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’च्‍या वर्ष २०२३ च्‍या बंगाली भाषेतील पंचांगाचे लोकार्पण करण्‍यात आले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *