Menu Close

नगर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त काढलेल्या वाहनफेरीत १०० हून अधिक दुचाकींचा समावेश !

वाहनफेरीत सहभागी धर्मप्रेमी

नगर – नगर येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या हिंदु-राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने २० जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता वाहन फेरी काढण्यात आली. उद्योजक श्री. प्रदीप पंजाबी आणि सौ. पंजाबी यांच्या हस्ते पूजन करून जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस हार अर्पण करून फेरीला प्रारंभ झाला. या फेरीचा प्रारंभ माळीवाडा येथून होऊन सबजेलचौक, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, तारकपूर चौक, प्रोफेसर चौक, भिस्तबाग, पाईपलाईन रोड, एकवीरा चौक, पारिजात चौक, गुलमोहर रोड, मार्गे जॉगिंग पार्क या ठिकाणी फेरीची सांगता करण्यात आली. १०० हून अधिक दुचाकी वाहनांसह २०० धर्मप्रेमी बंधू-भगिनी उपस्थित होते. ‘कौन चले रे कौन चले, हिंदु राष्ट्र के वीर चले’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले.

धर्मध्वजाचे पूजन करतांना उद्योजक श्री. प्रदीप पंजाबी आणि सौ. पंजाबी

या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट, विश्व हिंदु परिषदेचे ओमप्रकाश बायड, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतशेठ लोढा, शिवसेनेचे दिलीप सातपुते, योगीराज गाडे, ओंकार सातपुते, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अरुण (बापू) ठाणगे, वन्दे मातरम्चे महावीर कांकरिया, प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ दिगंबर गेंटयाल, दिनेश जोशी, संदीप खामकर, बजरंग दलाचे कुणाल भंडारी, सुदर्शन राष्ट्र निर्माणचे डॉ. पावन आर्य, हिंदु युवा वाहिनीच्या रागिणी तिवारी, भाजप महिला मोर्च्याच्या सौ. सुरेखाताई विद्दे आदींनी सहभाग घेतला होता. सर्वांनी सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला.

पूजन आणि पुष्पवृष्टी : फेरीच्या मार्गाने सबजेल चौक, दिल्लीगेट, प्रोफेसर चौक, गुलमोहर चौक या ठिकाणी धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी करण्यात आली.

विशेष : नगर शहराजवळील निंबोडी दरेवाडी जखणगाव, अरणगाव, सारोळा यांसारख्या आसपासच्या गावांतील तरुण मोठ्या संख्येने फेरीसाठी आले होते.

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *