Menu Close

छत्तीसगडमध्ये १ सहस्र १०० ख्रिस्ती मूळ हिंदु धर्मात परतले !

धर्मांतरित ख्रिस्त्यांना मूळ हिंदु धर्मात प्रवेश देताना भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव

रायपूर – छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील बसना येथे १ सहस्र १०० धर्मांतरित ख्रिस्त्यांनी मूळ हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. बसना येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेच्या वेळी आयोजित कार्यक्रमात या धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश केला. भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी गंगेच्या पाण्याने पाय धुवून सर्वांना हिंदु धर्मात परत आणले.

हिंदु धर्मात प्रवेश केलेल्या लोकांनी, ‘भूलथापांना बळी पडून आम्ही धर्मांतर केले होते; मात्र आमची चूक लक्षात आल्यानंतर आम्ही हिंदु धर्मात परतलो आहोत.’ कथावाचक हिमांशू कृष्ण महाराज यांनी या लोकांना शपथ दिली. जुदेव यांनी सांगितले की, सुमारे ३२५ कुटुंबांतील १ सहस्र १०० लोक सनातन धर्मात परतले आहेत.

१. याआधीही मार्च २०२२ मध्ये महासमुंदच्या कटंगपली गावात आयोजित विश्‍व कल्याण महायज्ञाच्या वेळी १ सहस्र २५० जणांनी हिंदु धर्मात प्रवेश केला होता.

२. मागील वर्षी ख्रिसमसच्या कालावधीत पाथळगाव येथील ५० ख्रिस्ती कुटुंबांना त्यांच्या मूळ हिंदु धर्मात परत आणले होते.

धर्मांतरितांना हिंदु धर्मात परत आणण्याचे कार्य करणारे भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव

भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव

वाजपेयी सरकारच्या काळात मंत्री राहिलेले दिलीपसिंह जुदेव यांनी त्या काळात ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या भूलथापांना बळी पडून धर्मांतर केलेल्या आदिवासी समाजातील लोकांना परत मूळ हिंदु धर्मात आणायचे कार्य केले होते. दिलीपसिंह जुदेव यांचे वर्ष २०१३ मध्ये निधन झाले. तेव्हापासून त्यांचा मुलगा प्रबल प्रताप सिंह जुदेव हे काम पुढे नेत आहे.

छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी १० सहस्रांहून अधिक लोकांना हिंदु धर्मात परत आणले आहे. ‘छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यापासून धर्मांतराचे षडयंत्र सातत्याने वाढत आहे’, असे जुदेव यांनी सांगितले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *