लंडन (ब्रिटन): चीन बनावटीचे शीतकपाट, भ्रमणभाष, भ्रमण संगणक (लॅपटॉप), मिक्सर ग्राईंडर आदी घरगुती उपकरणांद्वारे चीन ब्रिटीश नागरिकांची हेरगिरी करत आहे, असे ब्रिटन सरकारने दीर्घ तपासणीनंतर सांगितले. चीन अशा प्रकारे केवळ ब्रिटनमध्येच नाही, तर जगभरात हेरगिरी करत आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. या उपकरणांमध्ये बसवलेल्या मायक्रोचिपद्वारे चीन माहिती मिळवत आहे, असे सरकारच्या लक्षात आले आहे.
ब्रिटेन में चीनी LED लाइट्स के जरिए जासूसी: लैपटॉप, फ्रिज जैसे घरेलू सामान से भी जानकारी हासिल कर रहा चीन, इनमें माइक्रोचिप लगी हैंhttps://t.co/XX1cdkMHQB#Britain #ChineseProducts #Microchips pic.twitter.com/9JhJaqLe10
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) January 25, 2023
१. चारचाकी वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या चिनी पार्टसमध्येही चिप लावण्यात आली आहे. घरात लावलेल्या चिनी एल्.ई.डी. बल्बमध्येही हेरगिरीचे यंत्र असू शकते, असे सरकारचे म्हणणे आहेे.
२. ब्रिटनच्या अनेक विश्वविद्यालयांनी चिनी आस्थापनांसमवेत तंत्रज्ञानविषयक करार केले आहेत. या विश्वविद्यालयांतील संशोधनाची माहितीही चिनी आस्थापने चोरत असल्याची ब्रिटनला शंका आहे. आफ्रिकी देशांमध्ये हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या बहुतांश आस्थापनांचा यात समावेश आहे.
३. चीनची केवळ ३ आस्थापने ‘क्वेक्टेल’ ‘फायबोकॉम’ आणि ‘चायना मोबाईल’ यांचा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या जागतिक बाजारपेठेत ५४ टक्के वाटा आहे. जगातील १० मोठ्या भ्रमण संगणक आस्थापनांसाठी चीनच्या या ३ आस्थापनांने निर्मिलेले सुटे भाग वापरले जातात. दळणवळणाशी संबंधित उद्योगांध्येही या ३ आस्थापनांनी जगाच्या बाजारपेठेत ७५ टक्के वाटा मिळवला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही आस्थापनांवर चीन सरकारचे नियंत्रण आहे. ‘टेस्ला’सारख्या मोठ्या चारचाकी वाहने उत्पादन करणार्या आस्थापनेही ‘कनेक्टिव्हिटी’साठी याच ३ आस्थापनांच्या ‘नेटवर्क’चा वापर करतात.
४. बिटीश सरकारच्या मते, चिनी यंत्रातील हेरगिरी चीप ‘५-जी’ नेटवर्कद्वारे संचलित केली जाते. ती चीनमधील विविध ‘सर्व्हर’शी जोडली आहे. यात ब्रिटनमधील महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था, सैनिकी हालचाली आदींची माहिती पोचते.
५. ब्रिटनच्या अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेतील शस्त्रास्त्रांशी संबंधित बारीकसारीक हालचालीही चीनने सहज मिळवली होती. अमेरिका तैवानला कधी, किती आणि कोणती शस्त्रास्त्रे पुरवते आहे ?, याची माहिती चीनने आधीच मिळवली होती. शस्त्रास्त्र साठा पोचण्यापूर्वीच चीनने तैवानच्या चोहोबाजूला लढाऊ विमाने पाठवली, तसेच लढाऊ नौकाही तैनात केल्या होत्या.
६. चीनमध्ये २२ वर्षे राजनैतिक अधिकारी राहिलेले कॉर्लेस पार्टन म्हणाले की, ज्या देशात चिनी साहित्य जाते, तिथे हेरगिरी होते, असा संशय आहे. केवळ सुरक्षेच्या संदर्भातच नव्हे, तर हा चीनच्या दृष्टीने ग्राहकांची मते जाणून घेण्यासाठीचाही हा एक मार्ग आहे.
चीनकडून होणारी हेरगिरी रोखण्यासाठी उपाय सापडलेलाच नाही !
लॅपटॉप, व्हॉईस कंट्रोल्ड स्मार्ट स्पीकर, स्मार्ट वॉच, स्मार्ट एनर्जी मीटर, सीसीटीव्ही कॅमेरे, जगभरात पोलीस यंत्रणेत वापरले जाणारे कॅमेरे, डोअरबेल कॅमेरे, कार्ड पेमेंट मशीन, हॉट टब, चारचाकी गाडी आदी चीनकडून बनवले जातात किंवा त्यात चिनी सुटे भाग (पार्ट्स) असतात. त्याद्वारे होणारी हेरगिरी रोखण्यासाठी अद्याप उपाय सापडलेला नाही.
चीनला मिळते ही माहिती !
चिनी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून बँक खात्याशी संबंधित प्रत्येक माहिती चिनी संस्था गोळा करतात. तुम्ही कुणाला पैसे दिले ?, किती दिले ?, आपण पैसा कसा व्यय (खर्च) करतो ?, तुमच्या संपर्कात कोण कोण आहे ?, आदी सर्व माहिती चीनला सहज उपलब्ध होते. घरातील ‘सीसीटीव्ही कॅमेर्या’तील चित्रीकरणही चीनमध्ये पोचते. विशेष म्हणजे भ्रमणभाष संच (मोबाईल) बंद असला, तरीही त्यात व्हिडिओ-ऑडिओ रेकॉर्डिंग होत असते. जगभरातील लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्टफोनचे बहुसंख्य सुटे भाग हे ‘चायना मोबाइल’ आणि ‘फायबोकॉम’ आस्थापने बनवतात. त्यामुळे त्यांना या उपकरणांमधील माहिती पहाता येते. भारतात अद्याप ‘माहिती सुरक्षितता कायदा’ (‘डेटा प्रोटेक्शन’ कायदा) बनलेला नाही. त्यामुळे चिनी आस्थापनांना मोकळे रान मिळाले आहे. ब्रिटनसारख्या युरोपीय देशांमध्ये कडक नियम आहेत. तिथून माहिती (डेटा) बाहेर जात असल्याचे आढळल्यास तेथील चिनी आस्थापनांना जगभरातील उलाढालीच्या ४ टक्के दंड ठोठावला जातो. तो अब्जावधी रुपये असू शकतो.
संपादकीय भूमिका
अशा धूर्त चीनच्या सर्व वस्तू आयात करणे बंद करून भारताने त्याला धडा शिकवणे आवश्यक !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात