पास्टरसह ७ जणांना अटक !
इंदूर (मध्यप्रदेश): येथे हिंदु व्यक्तीला उपचारांच्या नावाखाली त्याच्या परिवारासह ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी ३ महिला आणि ४ पुरुष यांना अटक करण्यात आली आहे. ख्रिस्ती धर्मप्रचारक राय सिंह, त्याची पत्नी उर्मिला, मुलगा खेमराज, मित्र हाकिम, त्याची पत्नी मंगली, मान सिंह आणि त्याची पत्नी कालीबाई अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना हतुनिया फाटा गावातील आहे.
‘तुम्हारे भगवान कम शक्तिशाली हैं…’: इलाज के नाम पर पूरे परिवार को बनाया ईसाई, घर से फिकवा दीं हिंदू देवी-देवताओं की मूर्तियाँ#Indore #ReligiousConversion #Christianityhttps://t.co/h6ctvHDWVe
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 26, 2023
शेतमजूर मानसिंह यांची प्रकृती २ वर्षांपूर्वी फारच बिघडली होती. औषधोपचारांचा त्यांच्यावर परिणाम न झाल्याने एका व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून ते छापरी गावातील चर्चमध्ये गेले होते. तेथे झालेल्या उपचारानंतर तेे बरे झाले. एक वर्षानंतर ख्रिस्ती धर्मप्रचारक रायसिंह हा मानसिंह यांना भेटायला त्यांच्या घरी आला. तेव्हा पास्टर म्हणाला, ‘‘तुमचे देव शक्तीशाली नाहीत. तुम्हाला ख्रिस्ती धर्माच्या देवाने बरे केले आहे.’’ यानंतर त्याने मानसिंह यांच्या घरातील हिंदूंच्या देवतांची चित्रे आणि मूर्ती बाहेर काढल्या. त्याने काही पैसे आणि ख्रिस्ती धर्माची पुस्तके दिली, तसेच त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास सांगितला. ‘तसे केल्यास चांगले शिक्षण आणि आरोग्यासह अन्य सुविधाही विनामूल्य मिळतील’, असे आमीष दाखवले. यानंतर मानसिंह यांना सातत्याने आर्थिक साहाय्य मिळू लागले. काही दिवसांनी रायसिंह काही जणांना घेऊन मानसिंह यांच्या घरी आला आणि त्याने मानसिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर पाणी शिंपडून ‘आता तुम्ही ख्रिस्ती झालात’, असे सांगितले. मानसिंह यांनी त्यास नकार देत गावकर्यांना बोलावले. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली.
संपादकीय भूमिका
अशा उद्दाम ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई केल्यास इतरांवर वचक बसेल !
संदर्भ: दैनिक सनातन प्रभात