Menu Close

यावल (जिल्‍हा जळगाव) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत हिंदूंंचा कृतीशील होण्‍याचा निर्धार !

दीपप्रज्‍वलन करतांना सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, श्री. सुनील घनवट आणि कु. रागेश्री देशपांडे

जळगाव: जिहादच्‍या संकटात ‘हलाल जिहाद’ या आणखी एका जिहादची भर पडली आहे. इस्‍लामी संस्‍थांकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेतल्‍यानंतर हा ‘हलालचा लोगो’ उत्‍पादनांवर छापला जातो. निधर्मी भारतात उत्‍पादनांवर ही अनधिकृतपणे चाललेली धार्मिक प्रमाणपत्राची सक्‍ती कशासाठी ? आपल्‍या देशात भारत सरकारचे ‘अन्‍न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’, तसेच विविध राज्‍यांत ‘अन्‍न व औषध प्रशासन’ हे विभाग खाद्यपदार्थ तसेच औषधे यांच्‍याशी संबंधित अनुमती प्रमाणपत्रे देतात. ‘हलाल’ची अनिवार्यता मुसलमानांसाठी आहे; हिंदूंंवर हलाल प्रमाणपत्राची सक्‍ती कशासाठी ? हलाल प्रमाणपत्रातून मिळणार्‍या पैशांचा वापर कुठे केला जातो ? याचीही सखोल चौकशी करायला हवी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते २४ जानेवारी या दिवशी यावल येथे आयोजित हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत बोलत होते. या वेळी अनेक हिंदूंनी राष्‍ट्रकार्यासाठी कृतीशील होण्‍याचा निर्धार केला.

ते पुढे म्‍हणाले की, सावदा, फैजपूर, यावल या परिसरामध्‍ये सर्रासपणे गोतस्‍करी आणि गोहत्‍या होत आहेत. जळगावमध्‍ये अवैधपणे पशूवधगृहे चालू आहेत. गोहत्‍यारे मोकाट आहेत. गोरक्षकांवर आक्रमणे होत आहेत. हे थांबवायचे असेल, तर याविषयी आंदोलने व्‍हायला हवीत. वक्‍फ बोर्डाच्‍या माध्‍यमातून जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा, नाशिक जिल्‍ह्यातील निफाड यांसह अनेक ठिकाणी वक्‍फ बोर्डाने भूमींवर दावा लावला आहे. या माध्‍यमातून लँड जिहादच चालू आहे. शिवरायांच्‍या पराक्रमाने पावन झालेल्‍या भूमीमध्‍ये टिपू सुलतान आणि औरंगजेब यांचे उदात्तीकरण का केले जात आहे ?

या वेळी रणरागिणी शाखेच्‍या कु. रागेश्री देशपांडे यांनीही संबोधित केले. सभेसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्‍या गावांतील धर्माभिमानी हिंदू सहस्रोंच्‍या संख्‍येने उपस्‍थित होते.

कालमहिम्‍यानुसार वर्ष २०२५ मध्‍ये हिंदु राष्‍ट्र येणारच ! – सद़्‍गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

सध्‍याची जागतिक परिस्‍थिती पहाता तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी केव्‍हाही पडू शकते. भूकंप, उष्‍णतेची लाट, महापूर, टोळधाड, वादळे यांसारख्‍या संकटांची मालिका चालू आहेत. हा सर्व कालचक्राचा परिणाम आहे. कालमहिम्‍यानुसार वर्ष २०२५ मध्‍ये हिंदु राष्‍ट्र येणारच आहे. हिंदु राष्‍ट्राची पहाट पहाण्‍यासाठी साधना करून धर्माचरणी बनूया, असे मार्गदर्शन सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *