मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा अभिनंदनीय निर्णय !
मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या काळात अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री असतांना मालाड येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ याच्या नावाची कमान लावण्यात आली होती. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच भाजप यांनी या कमानीला विरोध दर्शवला होता. सर्व स्तरांवर होणारा विरोध लक्षात घेऊन मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मागील सरकारच्या काळात उद्यानाला दिलेले टिपू सुलतान याचे नाव पालटण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांना दिला आहे. (लाखो हिंदूंचे शिरकाण करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान कुणाला प्रिय आहे, हे हिंदूंनी वेळीच ओळखावे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांसह अन्य काही सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई उपनगराच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मालाड येथील उद्यानाचे नाव पालटण्याची मागणी केली होती. याविषयी मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘पालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोणत्याही कागदपत्रांवर उद्यानाला ‘टिपू सुलतान’ याचे नाव असल्याचा संदर्भ नाही. त्यामुळे मागील सरकारच्या काळात उद्यानाला केलेले नामकरण पालटण्यात येईल. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात