Menu Close

उमरी (यवतमाळ) येथील ‘फ्री मेथाडिस्ट मिशन’कडील ४२ एकर भूमी शासनजमा !

भूमीचा अपवापर केल्याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

‘फ्री मेथाडिस्ट मिशन’ – लीजवर मिळालेल्या भूमीचा परस्पर आर्थिक व्यवहार करून स्वार्थ साधू पहाणारी संस्था समाजहित काय जोपासणार ?

यवतमाळ: जिल्ह्यातील उमरी (तालुका पांढरकवडा) येथील ‘फ्री मेथाडिस्ट मिशन’ला स्वातंत्र्यपूर्वकाळात ४२ एकर ५ गुंठे भूमी शासनाने ‘लीज’वर (‘लीज’ म्हणजे एखादी सामान्य मालमत्ता भाड्याने दिली जाणे. ‘लीज’ हा दोन पक्षांमधील करार असतो.) दिलेली होती. टीबी रुग्णालय, तलाव, शाळा आणि वसतीगृह यांसाठी लीजवर मिळालेल्या भूमीचा अपवापर होत असल्याप्रकरणी उमरी येथील जागरूक नागरिक श्री. विलास राजेश्वर आत्राम यांनी अमरावती आयुक्तांकडे तक्रार केली. (समाजकर्तव्य पार पाडणारे असे नागरिक सर्वत्र हवेत ! भूमीचा अपवापर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याविषयीचा खटला यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांकडे चालला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भूमीच्या अपवापराचा ठपका ठेवत मिशनला ४२ एकर ५ गुंठे भूमी शासनजमा करण्याचा आदेश दिला.

‘फ्री मेथाडिस्ट मिशन’ ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत होती. त्यासाठी तत्कालीन गव्हर्नरांनी ७ मे १९४२ या दिवशी ४२ एकर ५ गुंठे ही ‘सी क्लास’ भूमी लीजवर मिशनला दिली. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली ही मौल्यवान भूमी १९ एप्रिल १९७३ या दिवशी अन्य एका संस्थेला कुठल्याही अनुमतीविना मिशनने परस्पर हस्तांतरित केली. मोठ्या आर्थिक लाभासाठी हा व्यवहार करण्यात आला. (लीजवर मिळालेल्या भूमीचा परस्पर आर्थिक व्यवहार करून स्वार्थ साधू पहाणारी संस्था समाजहित काय जोपासणार ?- संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *