Menu Close

बेळगाव आणि म्‍हैसाळ (जिल्‍हा सांगली) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन

जिल्‍हाधिकारी कार्यालयात शिरस्‍तेदार परगी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी

बेळगाव – बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी ‘संत तुलसीदास रचित ‘श्रीरामचरितमानस’ याला द्वेष पसरवणारा ग्रंथ म्‍हटले’, तर उत्तरप्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्‍वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’च्‍या चौपाईवर (दोह्यावर) प्रतिबंध घालण्‍याची मागणी करतांना हा ग्रंथ कह्यात घेऊन त्‍याला नष्‍ट केले पाहिजे’, असे संतापजनक वक्‍तव्‍य केले आहे. त्‍यामुळे दोन्‍ही नेत्‍यांवर धार्मिक भावना दुखावल्‍याप्रकरणी तात्‍काळ गुन्‍हे नोंदवून त्‍यांना अटक करण्‍यात यावी आणि असे होणारे अवमान रोखण्‍यासाठी केंद्रशासनाने राष्‍ट्रीय पातळीवर धर्मनिंदा निषेध कायदा लागू करावा, या मागण्‍यांसाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍या वतीने २७ जानेवारीला ‘डी.सी. कंपाउंड’ येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन करण्‍यात आले.

आंदोलनानंतर जिल्‍हाधिकारी यांच्‍या अनुपस्‍थित शिरस्‍तेदार परगी यांना निवेदन देण्‍यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले. या आंदोलनामध्‍ये श्रीराम सेनेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. रवी कोकीतकर, भाजपचे श्री. पंकज घाडी, बजरंग दलाचे श्री. विजय होंडाड, ‘कर्तव्‍य महिला मंडळा’च्‍या सौ. अक्‍काताई सुतार आणि सौ. मिलन पवार, हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. सदानंद मासेकर, तसेच अन्‍य कार्यकर्ते उपस्‍थित होते.

म्‍हैसाळ (जिल्‍हा सांगली) येथेही हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन !

म्‍हैसाळ येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलनात सहभागी हिंदुत्‍वनिष्‍ठ

‘श्रीराम आणि श्रीरामचरितमानस यांचा अवमान करणार्‍यांना त्‍वरित अटक करण्यात यावी’ या मागणीसाठी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने म्‍हैसाळ येथे ३० जानेवारीला आंदोलन करण्‍यात आले. या प्रसंगी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. सुरेश लडगे, स्‍वामी समर्थ मंडळाच्‍या अपर्णा सुतार, हिंदुत्‍वनिष्‍ठ सर्वश्री विश्‍वनाथ धुमाळ, शेखर सुतार, दत्तात्रय शिंदे यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्‍थित होते. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीच्‍या श्रीमती मधुरा तोफखाने, कु. प्रतिभा तावरे आणि श्री. संतोष देसाई यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. आंदोलनात झालेल्‍या मागण्‍यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ३१ जानेवारीला सांगली येथे निवासी उपजिल्‍हाधिकारी मौसमी बर्डे यांना देण्‍यात आले.

विशेष

आंदोलन चालू असतांना आजूबाजूला असलेले अनेक लोक थांबून विषय ऐकत होते.

या प्रसंगी करण्‍यात आलेल्‍या अन्‍य मागण्‍या

१. जैन पंथियांचे श्रद्धास्‍थान सम्‍मेद शिखरजी तीर्थक्षेत्र म्‍हणून घोषित करावे.

२. महाराष्‍ट्रात ‘लव्‍ह जिहादविरोधी कायदा’, तसेच ‘धर्मांतरविरोधी कायदा’ लागू करावा.

३. वक्‍फ बोर्डाला देशातील भूमी बळकावण्‍याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करावा.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *