गोमुत्राचा समावेश असलेली उत्पादने वापरण्यावर बंदी घालणारा फतवा बरेलीतील आला हजरत या दर्ग्याने काढला आहे. गोमुत्राचा समावेश असलेल्या कुठल्याही कंपनीचे उत्पादन वापरणे शरीयतच्या विरोधात आहे, असे फतव्यात म्हटले आहे.
विविध कंपन्यांच्या उपत्पादनांमध्ये गोमुत्राचा समावेश आहे. अशी उत्पादने वापरावीत का ? असा प्रश्न बरेलीतील बख्तियार खान यांनी उपस्थित केला होता. या संबंधी आला हजरत मार्काझी दारूल इस्ता या दर्ग्याच्या मौलवींनी हा फतवा जारी केला. गोमुत्राचा समावेश असलेली उत्पादने प्राशन करण्यास किंवा शरीरावर लावण्यास फतव्यातून बंदी घातली आहे. दर्ग्याचे प्रमुख मुफ्ती मुझफ्पर हुसेन आणि त्यांचे सहकारी मौलवींनी हा फतवा काढला.
गोमुत्राचा समावेश असलेले पदार्थ वापरण्यावर शरीयतनुसार बंदी आहे. गोमुत्र हे धर्मविरोधी आहे, असे शरीयतचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांनी गोमुत्राचा समावेश असलेले कुठलेली पदार्थ खाऊ नये, प्राशन करू नये किंवा शरीरावर लावू नये. याशिवाय गोमुत्र असलेली औषधेही घेऊ नयेत. असे केल्यास शरीयतनुसार ते इस्लमाविरोधी ठरेल, असे दर्ग्याचे माध्यम समन्वयक मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी सांगितले.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स