Menu Close

उज्जैन येथील सिंहस्थपर्वात साधूसंतांचे विडंबन करणार्‍या टी-शर्टची विक्री !

उज्जैन : येथील वैश्‍विक सिंहस्थपर्वामध्ये प्रतिदिन लाखोंच्या संख्येने भाविक स्नानासाठी आणि साधूसंतांच्या दर्शनासाठी येत आहेत. साधूसंतांचे अवमान करणारे टी-शर्ट घालून काही युवक फिरत असल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे.

अशा टी-शर्टची विक्रीही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कपड्यांच्या दुकानात असे टी-शर्ट आणि तयार (रेडीमेड) भगवे वस्त्र, रुद्राक्षांच्या माळा सर्वांत पुढे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या रुद्राक्षांच्या माळा घालून अंघोळ केल्यास त्यांचा रंग अंगावर उतरत असल्याचे निदर्शनास आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *