हिंदु जनजागृती समितीचे बोकारो (झारखंड) येथील आंदोलनात करण्यात आली मागणी !
बोकारो (झारखंड) – उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यादव यांनी ‘रामचरितमानस’ ग्रंथाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. तसेच कर्नाटकमध्ये के.एस्. भगवान यांनी प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांच्याविषयी हीन पातळीवर टीका केली. त्यामुळे अशा प्रकारे सातत्याने होणारा हिंदु देवीदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’मध्ये करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ फेब्रुवारी या दिवशी येथील सिटी सेंटर, सेक्टर-४ मधील गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘गुजरात दंगलीविषयी खोटी माहिती प्रसारित करून भारताची प्रतिमा मलिन करणार्या ‘बीबीसी न्यूज’वर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनानंतर बोकारोचे उपायुक्त कुलदीप चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ
रा.स्व. संघाचे श्री. अरुण कुमार, श्री. अशोककुमार यादव, श्री. कृष्णदेव मोदी, श्री. बिजेंद्र नारायण दत्त, भाजपचे सर्वश्री रोहित लाल सिंह, योगेंद्र कुमार, मनीषकुमार पांडेय, भारतीय मजदूर संघाचे सर्वश्री कृष्णा राय, राम श्रेष्ठ चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व-पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक शंभू गवारे, धर्मप्रेमी सर्वश्री रणजीत सिंह, अनुरंजन कुमार, राजेश सिंह
? #हिंदुराष्ट्र जागृति आंदोलन में @HinduJagrutiOrg की ओर से बोकारो, झारखंड में आंदोलन कर ..#Ban_BBC_In_India
भारत में ईशनिंदा विरोधी कानून कर #रामचरितमानस का अपमान करने वालों पर करवाई की मांग को लेकर @BokaroDc ज्ञापन दिया !@Ramesh_hjs @Real_suyash_69 @meriteshkashyap pic.twitter.com/V0hDU4IuTb— ?Shambhu ?? © (@Shambhu_HJS) February 8, 2023
रांची येथे उपायुक्त राहुल कुमार सिन्हा यांना दिले निवेदन !
वरील विषयाचे निवेदन रांचीचे उपायुक्त राहुल कुमार सिन्हा यांना देण्यात आले.
या वेळी ‘राष्ट्र बचाओ आंदोलना’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. सुनील सिंह, धर्मप्रेमी सर्वश्री राजीव सिंह, भुनेश्वर त्रिपाठी, नीतू अरोरा आणि समितीच्या पूजा चौहान आदी उपस्थित होते.