Menu Close

‘भारतविरोधी ‘बीबीसी’चा हिंदूद्वेष’ या विषयावर विशेष संवाद !

‘बीबीसी’च्या ‘डॉक्युमेंट्री’वर फक्त बंदी नव्हे, तर राष्ट्रभक्तांनी ‘बीबीसी’ला धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक

ज्या ब्रिटिशांनी आपल्या भारताची संपत्ती लुटली, आपला कोहिनूर हिरा चोरला, अशा चोर ब्रिटिशांचा प्रचार करणारी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनी आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्ष 2002 च्या गुजरात दंगलीविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरवून सुद्धा गुजरात दंगलीविषयी मा. मोदी यांना जबाबदार धरून त्यावर ‘बीबीसी’ने केलेली ‘डॉक्युमेंट्री’ हा केवळ त्यांच्यावरील हल्ला आहे, असे संकुचित दृष्टीने न पाहता हा हिंदूंवरील हल्ला या दृष्टीने पाहायला हवे. ‘भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू स्त्रिया आणि भगिनी यांच्यावर झालेले अत्याचार’, ‘मोपला हत्याकांड’, ‘हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस’ या विषयांवर ‘बीबीसी’ कधी ‘डॉक्युमेंट्री’ करणार नाही. भारताचे पुन्हा विभाजन व्हावे, भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये, यासाठी भारतविरोधी शक्ती कार्यरत असून ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे. ‘गोबेल्स नीती’चा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’च्या ‘डॉक्युमेंट्री’वर फक्त बंदी आणून चालणार नाही, तर देशातील राष्ट्रभक्त लोकांसह सर्व संघटनांनी मिळून ‘बीबीसी’ला धडा शिकवायला हवा, असे स्पष्ट प्रतिपादन ‘सनातन संस्थे’चे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भारतविरोधी ‘बीबीसी’चा हिंदूद्वेष’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

कर्नाटक येथील पत्रकार श्रीलक्ष्मी राजकुमार म्हणाल्या की, ‘बीबीसी’च्या ‘डॉक्युमेंट्री’मध्ये मोदीजींवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हे प्रश्नचिन्ह केवळ मोदींवर नसून भारताच्या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे. ‘बीबीसी’ला चीनच्या आस्थापनांकडून आर्थिक पुरवठा केला जात असून भारताच्या विरोधात ‘माहिती युद्ध’ छेडले आहे. वर्ष 2024 च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हे केले जात आहे, अशी शंका निर्माण केली जात आहे. भारत आता एक जागतिक नेतृत्व बनत असून भारताला कमकुवत करण्याचे कारस्थान ‘बीबीसी’ आणि त्याला पाठिंबा देणारे करत आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *