भारतात ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी घाला – राष्ट्रप्रेमींची मागणी
धनबाद (झारखंड) – आधी ‘हलाल’ संकल्पना ही केवळ मांसाहार पदार्थांपर्यंत आणि मुसलमान देशांमध्ये निर्यात करण्यापर्यंतच मर्यादित होती; परंतु आता भारतात साखर, तेल, गव्हाचे पीठ, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनांचेही ‘हलाल प्रमाणीकरण’ केले जात आहे. यातून भारतात समांतर अर्थव्यवस्था उभी रहात आहे. या राष्ट्रविरोधी हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने येथील रणधीर वर्मा चौकामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. यानंतर येथील उपायुक्त संदीप सिंह यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
? हलाल अर्थव्यवस्था के द्वारा भारतीय व्यापारतंत्र पर होनेवाले आक्रमण का विरोध करने हेतु संगठित हो ! #हलाल सख्ती विरोधी कृति समिति द्वारा रणधीर वर्मा चौक में प्रदर्शन
?Sign petition: https://t.co/VXrOfw2PGG@HinduJagrutiOrg @meriteshkashyap @Ramesh_hjs pic.twitter.com/NXJeE6UL7p
— ?Shambhu ?? © (@Shambhu_HJS) February 2, 2023
या आंदोलनामध्ये स्वामी लोचन महाराज मिश्रा यांच्या समवेत ‘तरुण हिंदू’ या संघटनेचे डॉ. नील माधव दास, आर्य महासंघाचे श्री. राजेश बरनवाल, रा.स्व. संघाचे श्री. रमेश, विहिंपचे श्री. सुनील कुमार, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे, राष्ट्रप्रेमी सर्वश्री अमरजीत प्रसाद, दीपक केशरी, समरपाल सिंह, एम्. पी. शर्मा, प्रमोद श्रीवास्तव आणि कु. कनक आदी अनेक हिंदुत्वनिष्ठ अन् राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते.