Menu Close

कन्हैयालाल यांची हत्या करण्यासाठी शेजारील मुसलमानांनी साहाय्य केले !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने सादर केलेल्या आरोपपत्रात माहिती !

उदयपूर (राजस्थान) – येथे २८ जून २०२२ या दिवशी शिंपी कन्हैयालाल तेली यांची दोघा मुसलमानांकडून शिरच्छेद करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ३ सहस्र ५०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. यात म्हटले आहे की, ही हत्या करण्यासाठी कन्हैयालाल यांच्या मुसलमान शेजार्‍यांनी त्यांची माहिती गोळा करून ती खुन्यांना देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच या हत्येसाठी पाकिस्तानमधून आदेश देण्यात आला होता.

१. शेजार्‍यांमध्ये वसीम हा सौंदर्य प्रसाधनगृहाचे दुकान आहे. घाऊक व्यापारी रझा उपाख्य  मुस्लिम खान, चष्म्यांच्या दुकानात काम करणारा आसिफ हुसैन, बांगड्यांच्या दुकानात काम करणारा महंमद जावेद आणि मांसाचे दुकान चालवणारा महंमद मोहसिन यांचा शेजार्‍यांमध्ये समावेश होता, ज्यांनी हत्येत साहाय्य केले.

२. कन्हैयालाल यांच्या हत्येसाठी एक व्हॉट्स अ‍ॅप गट बनवण्यात आला होता. यात अनेक पाकिस्तानी सहभागी झाले होते. याचा प्रमुख कराचीमधील सलमान अत्तारी होता. तोच या हत्येचा मुख्य सूत्रधार होता. या गटाद्वारे ‘तहरीक ए लब्बैक पार्टी’चे कट्टरतावादी विचारसरणीचा प्रसार केला जात होता. कन्हैयालाल यांच्या हत्येतील आरोपी महंमद गौस हा कराचीमध्ये जाऊन सलमान अत्तारी याला भेटला होता.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *