Menu Close

‘बंगालच्या सीमा भागात सीमा सुरक्षा दलाने दहशत माजवली आहे !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विधानसभेत आरोप !

सीमेचे रक्षण करणार्‍या एका दलावर अशा प्रकारचा आरोप केवळ राष्ट्रघातकीच करू शकतात ! अशा आरोपातून ममता बॅनर्जी यांची मानसिकता लक्षात येते ! यासाठीच बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावणे आवश्यक आहे ! -संपादक

डावीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. (याहून मोठा विनोद काय असू शकतो ? – संपादक) असे असले, तरी राज्याच्या सीमावर्ती भागांत सीमा सुरक्षा दलाने दशहत माजवली आहे. सीमावर्ती भागांत निर्दोष लोक मारले जात आहेत; परंतु या हत्यांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने साधी चौकशी समिती नेमण्याचीही तसदी घेतली नाही, असा फुकाचा आरोप बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या विधानसभेत केला. (बंगालमध्ये भाजप आणि अन्य हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. अशा किती घटनांच्या चौकशा ममता बॅनर्जी यांच्या सरकारने केल्या ? आणि किती जणांना शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न केला ?, हे त्यांनी सांगायला हवे ! – संपादक)

केंद्रशासनाने गायीला आलिंगन देण्याचे आवाहन मागे घेतल्यावरून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर एखादी व्यक्ती गायीला मिठी मारायला गेली आणि गायीने त्या व्यक्तीला शिंग मारले किंवा लाथ मारली, तर काय होईल ? भाजप सरकार लोकांना भरपाई देईल का ? (बंगालसह देशात गोहत्या वाढत आहेत. बंगाल येथील बांगलादेश सीमेवरील गायींची बांगलादेशात तस्करी केली जात आहे, ते रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या सरकार गेल्या १५ वर्षांत काय प्रयत्न केले, हे त्यांनी सांगायला हवे ! – संपादक) भाजप सरकार इतक्या खालच्या पातळीवर गेले आहे की, त्यांनी नोबेल पुरस्कारप्राप्त अमर्त्य सेन यांचाही अपमान केला. (‘जय श्रीराम’ म्हटल्यावर ममता बॅनर्जी यांना जो काही राग येतो, तो भगवान श्रीराम यांचा अवमान नाही, तर काय आहे ? – संपादक)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *