सुदान देशातील अशिक्षित आदिवासींना गोमातेचे महत्त्व जितके ठाऊक आहे, तितके महत्त्व भारतातील सुशिक्षित राजकारणी आणि सत्ताधारी यांना का माहिती नाही ?
नवी देहली : आफ्रिका खंडातील सुदान देशाचे मुंदारी जातीचे आदिवासी गाय आणि बैल यांच्यावर अतूट प्रेम करतात आणि त्यांना आपल्या परिवारातील एक घटक समजतात. गायीची देवाप्रमाणे पूजा करणे आणि त्यांची देखभाल करणे हेच त्यांचे एकमेव काम असते.
१. मुंदारी आदिवासी गोमूत्राने अंघोळ करतात. कारण त्यांचा विश्वास आहे की, यामुळे शरिराला कोणताही रोग होत नाही. तसेच त्वचा फिकट नारंगी रंगाची होते.
२. संसर्गापासून बचाव होण्यासाठी ते गायीचे दूध थेट पितात. त्यांची श्रद्धा आहे की, गायच त्यांचे जीवन वाचवू शकते. त्यामुळे ते बंदूक घेऊनच गोरक्षण करत असतात.
३. प्रतिवर्षी येथे ३ लाख ५० सहस्र गाई आणि बैल यांची चोरी होते. यात २ सहस्र ५०० चोरटे मारले जातात.
४. येथील महिला शेणापासून गोवर्या बनवात. गोवर्या जाळल्यानंतर निर्माण होणार्या राखेचा उपयोग पावडरप्रमाणे चेहर्याला लावण्यासाठी करतात. त्यांचा विश्वास आहे की, यामुळे त्वचा अधिक चांगली होते.
५. गोवर्यांच्या राखेवर ते झोपतात आणि आजारपणातही याच राखेचा उपयोग करतात. उन्हाळ्यापासून ही राखच त्यांना वाचवते.
६. येथे एका गायीची किंवा बैलाची किंमत ५०० डॉलर म्हणजे ३३ सहस्र रूपये इतकी आहे.
७. येथे गायीला जीवन रक्षक आणि बैलाला वीर योद्धा या रूपात पूजतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात