- भारतात एखाद्या अल्पसंख्यांक शिक्षकाच्या विरोधात अशी घटना झाली असती, तर ढोंगी निधर्मीवाद्यांनी अकांडतांडव केले असते आणि त्यांचेच भाऊबंद असणार्या प्रसारमाध्यमांनी त्यात तेल ओतले असते !
- भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणारे भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंची ही दयनीय स्थिती रोखण्यासाठी काही करणार नाही; म्हणून जगभरातील हिंदूंच्या रक्षणार्थ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
ढाका : बांगलादेशातील बंदार उपजिल्ह्यातील पियर सत्तर लतीफ शाळेच्या श्यामल कांति भक्त या मुख्याध्यापकांना इस्लामचा कथित अवमान केल्याच्या आरोपावरून मारहाण करण्याची घटना घडली. त्यांना उठाबशा काढण्यास लावण्यात आल्या. या वेळी अवामी लीगचे स्थानिक खासदारही उपस्थित होते. या घटनेची चौकशी करण्याचा आदेश बांगलादेश सरकारने दिला आहे.
१. श्यामल यांनी एका मुसलमान विद्यार्थ्याला अभ्यास न केल्यावर दंड करतांना इस्लाम विषयी कथित अवमानकारक विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.
२. त्यानंतर मशिदीवरील भोंग्यांवरून या संदर्भात लोकांना माहिती देण्यात आल्यावर मोठ्या संख्येने मुसलमान शाळेबाहेर जमा झाले.
३. या धर्मांधांनी श्यामल यांना मारहाण केली. या वेळी सत्ताधारी अवामी लीगचे खासदार सलीम उस्मान उपस्थित होते.
४. पोलिसांनी घटनास्थळी येऊन श्यामल यांची सुटका केली. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
५. श्यामल यांचे म्हणणे आहे की, त्यांनी इस्लामवर कोणतेही विधान केले नाही. शाळेच्या व्यवस्थापनातील काही लोक त्यांच्या विरोधात असल्याने त्यांनी लोकांना उद्युक्त केले आणि अशा लोकांनीच मारहाण केली.
६. दंड केलेल्या विद्यार्थ्यानेही म्हटले आहे की, मुख्याध्यापकांनी इस्लामचा अवमान केलेला नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात