सोलापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी
सोलापूर – मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी वक्फ कायदा आहे, असे वरकरणी दिसते; मात्र या ‘वक्फ कायद्या’च्या माध्यमातून हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्तीही सहज बळकावता येते. त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. विक्रम घोडके यांनी केली. २२ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समिती तथा शहरातील विविध समविचारी संघटना यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, जिल्हा परिषद या ठिकाणी विविध मागण्यांसाठी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे, श्री. लिंगराज हुळ्ळे, सौ. राजश्री देशमुख, श्री. ऋतुराज अरसिद, श्री. राजन बुणगे आणि श्री. विनोद रसाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनास सर्वश्री अविनाश मदनावाले, आनंद गोसकी, भाग्यश्री धपाटे, अनिल बोध्दूल, लालकृष्ण दुंपेटी, रितेश बाकळे, नरसिंग दासरी, आनंद कोंडा, मनोज बुधारम, निखिल बिनगुंडी यांसह मोठ्या संख्येने राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिक उपस्थित होते. या वेळी हिंदूंवर हलाल प्रमाणित उत्पादनांची सक्ती नको यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्या सर्व संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करा, तसेच श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधी लुटणार्यांवर कारवाई करा’ या मागण्याही या वेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी स्वीकारले.
श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधी लुटणार्यांवर कारवाई करा ! – ऋतुराज अरसिद, धर्मप्रेमी
हलाल प्रमाणित वस्तू खरेदी न करण्याचा निर्धार प्रत्येक हिंदूने केल्यास संपूर्ण देशातून हलाल प्रमाणपत्र हद्दपार होऊ शकते. तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी यापूर्वीही अनेक आंदोलने झाली आहेत. आता देवनिधी लुटणार्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हायला हवी.