Menu Close

छत्तीसगडमध्ये २५० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

हिंदु धर्मात पुनर्प्रवेश

रायपूर – जशपूर येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २५० लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी ‘अखिल भारतीय घरवापसी’ चळवळीचे प्रमुख प्रबल प्रतापसिंह जूदेव यांनी पुढाकार घेतला. धर्मांतर केलेले हे २५० लोक ३६ वेगवेगळ्या कुटुंबांतील आहेत. चिपनीपाली येथील इमलीपारा येथे हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या वेळी प्रबल प्रतापसिंह जूदेव यांनी ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करणार्‍या लोकांचे पाय गंगाजलाने धुतले. या वेळी ‘धर्म जागरण समन्वय विभाग’ आणि ‘आर्य समाज’ या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर वेदमंत्रपठण आणि हवन करण्यात आले. त्यानंतर हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करणार्‍यांनी ‘भविष्यातही आम्ही हिंदु धर्मामध्येच राहू’, असा संकल्प केला.

छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारकडून हिंदूंच्या धर्मांतराकडे दुर्लक्ष ! – प्रबल प्रतापसिंह जूदेव

‘धर्मांतर हे राष्ट्रीय ऐक्याच्या विरोधात रचलेले षड्यंत्र असून त्यामुळे देशाच्या अखंडतेला धोका आहे. ख्रिस्ती मिशनरी हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार आणि प्रशासन हिंदूंच्या धर्मांतराकडे दुर्लक्ष करत आहे’, असा आरोप प्रबल प्रतापसिंह जूदेव यांनी केला.

(अशा हिंदुद्वेषी काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हिंदूंनी कटीबद्ध व्हावे ! – संपादक)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *